Pakistan stock market : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २६ पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नाड्या आवळायला सुरुवात केली आहे. आधीच सिंधू पाणी करार आणि अटारी वाघा बॉर्डर बंद केल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरत असतानाचा शेअर बाजारही मोठ्या प्रमाणात कोसळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशातील लष्करी अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. यानंतर भारत पाकिस्तानवर हल्ला करणार असल्याची भीती शेजारी राष्ट्राला भिती आहे. हल्ल्याच्या शक्यतेबाबत अनिश्चिततेमुळे बुधवारी पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज (PSX) मध्ये २००० हून अधिक अंकांची मोठी घसरण झाली.
मंगळवारी देशाचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी केलेल्या विधानामुळे ही भीती आणखी वाढली आहे. म्हणाले, की पाकिस्तानकडे ठोस माहिती आहे की भारत पुढील २४ ते ३६ तासांत लष्करी कारवाई करू शकतो. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांची बैठक घेतली. दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याचे पूर्ण अधिकार त्यांना दिले आहेत.
पाकिस्तानी शेअर बाजारात भीतीचे वातावरणबुधवारी सकाळी कराची स्टॉक एक्सचेंज १०० मध्ये १७१७.३५ अंकांची किंवा १.५ टक्क्यांनी घसरण होऊन ११३,१५४.८३ वर व्यवहार करत होता. तर एक दिवस आधी तो ११४.८७२.१८ वर बंद झाला होता. सकाळी १०.३८ वाजता, त्याचा निर्देशांक मागील दिवसाच्या तुलनेत २,०७३.४२ अंकांनी किंवा १.८ टक्क्यांनी खाली आला.
चेस सिक्युरिटीजचे संशोधन संचालक युसुफ एम. फारुख म्हणाले की, पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजमधील घसरण पुढील काही दिवसांत हल्ल्यांच्या भीतीमुळे झाली आहे. तर एकेडी सिक्युरिटीजच्या फातिमा बुचा म्हणाल्या की, माहिती मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेमुळे गुंतवणूकदारांच्या चिंता वाढल्या आहेत. ते म्हणाले की, सध्या बाजारात खूप दबाव आहे यात शंका नाही.
वाचा - जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
पाकिस्तानच्या माहिती मंत्र्यांनी भीती वाढवलीऑल कराची ताजीर इत्तेहाद असोसिएशनचे अध्यक्ष अतिक मीर म्हणाले की, राजकीय आणि लष्करी तणावामुळे सर्व व्यावसायिक क्षेत्रात अनिश्चितता आहे. ते म्हणाले की, पुढे काय होईल याची सर्वांना चिंता आहे, म्हणूनच बाजारपेठा आणि खरेदी केंद्रे देखील पूर्वीसारखे व्यवसाय करू शकत नाहीत.