Join us

शेअर बाजार जोरदार आपटला; ७०० अंकांपेक्षा अधिक घसरला Sensex, Nifty २२,३५० च्या खाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 09:44 IST

Stock Markets Today: भारतीय शेअर बाजारात मार्च सीरिजची सुरुवात कमकुवत ट्रिगरसह होत आहे. मार्च सीरिजची सुरुवात जबरदस्त घसरणीनं झाली.

Stock Markets Today: भारतीय शेअर बाजारात मार्च सीरिजची सुरुवात कमकुवत ट्रिगरसह होत आहे. मार्च सीरिजची सुरुवात जबरदस्त घसरणीनं झाली. सेन्सेक्स ५०० अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होता, पण त्यानंतर तो ७०० अंकांनी घसरला. तर निफ्टीनंही २०० अंकांच्या घसरणीसह २२,३५० ची पातळी ओलांडली. बँक निफ्टीही ४०० अंकांच्या घसरणीवर व्यवहार करत होता.

निफ्टीवर कोल इंडिया, श्रीराम फायनान्स, ग्रासिम या कंपन्यांचे शेअर्स वधारले. इंडसइंड बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, एनटीपीसी, टाटा स्टील, टेक महिंद्रा यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले.

मागील बंदवर नजर टाकली तर सेन्सेक्स ४११ अंकांनी घसरून ७४,२०१ वर आला. निफ्टी ११२ अंकांनी घसरून २२,४३३ वर आणि बँक निफ्टी ३०६ अंकांनी घसरून ४८,४३७ वर उघडला. चलन बाजारात रुपया १३ पैशांनी घसरून ८७.३३ / डॉलर वर पोहोचला.

त्यानंतर ट्रम्प यांच्या टॅरिफच्या भीतीमुळे अमेरिकी बाजार दिवसाच्या नीचांकी पातळीवर घसरले. डाऊ ६५० अंकांनी घसरला होता, मात्र नंतर त्यात थोडी सुधारणा होऊन तो २०० अंकांनी घसरला, तर नॅसडॅक ५३० अंकांनी घसरून ४ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. आज सकाळी गिफ्ट निफ्टी १७० अंकांनी घसरून २२,५१७ वर आला. डाऊ फ्युचर्स सुस्त आहेत. तर निक्केईमध्ये १००० अंकांची मोठी घसरण झाली होती.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक