Join us

Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; हिंदाल्कोमध्ये तेजी, मारुतीचे शेअर्स घसरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 09:46 IST

Opening Bell Today: चालू आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी शेअर बाजाराच्या कामकाजाला तेजीसह सुरुवात झाली आहे. बीएसई सेन्सेक्स १४४ अंकांच्या वाढीसह ७५,५४२ अंकांवर उघडला.

Opening Bell Today: चालू आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी शेअर बाजाराच्या कामकाजाला तेजीसह सुरुवात झाली आहे. बीएसई सेन्सेक्स १४४ अंकांच्या वाढीसह ७५,५४२ अंकांवर उघडला, तर निफ्टी ४७ अंकांच्या वाढीसह २२,९७९ अंकांवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक तेजीसह काम करत होता.  

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात तेजी दाखविणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये हिंडाल्को, श्रीराम फायनान्स, विप्रो, जेएसडब्ल्यू स्टील, एनटीपीसी, अदानी एंटरप्रायझेस आणि महिंद्रा यांच्या शेअर्सचा समावेश होता, तर मारुती, एअरटेल, एशियन पेंट्स, टेक महिंद्रा, ब्रिटानिया, हीरो मोटोकॉर्प आणि आयशर मोटर्सच्या शेअर्समध्ये घसरण झाली. 

टॉप गेनर आणि टॉप लूझर कोण? 

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात तेजी दर्शविणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये लार्सन अँड टुब्रो, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक आणि एचसीएल टेकच्या शेअर्सचा समावेश होता, तर घसरण झालेल्या कंपन्यांच्या समभागांमध्ये एचडीएफसी बँक, इन्फोसिस, अशोक लेलँड, एशियन पेंट्स, टीसीएस, ओएनजीसी, भारत इलेक्ट्रॉनिक्स, इरकॉन इंटरनॅशनल आणि इंजिनिअर्स इंडिया लिमिटेडच्या शेअर्सचा समावेश होता. 

प्री ओपनमध्ये स्थिती काय? 

मंगळवारी प्री ओपन मार्केटमध्ये शेअर बाजार १९६ अंकांच्या वाढीसह ७५,५८६ अंकांवर व्यवहार करत होता, तर निफ्टी ४५ अंकांच्या वाढीसह २२९७८ अंकांवर व्यवहार करत होता. शेअर बाजाराचे कामकाज सुरळीत सुरू होऊ शकते, असे संकेत गिफ्ट निफ्टीकडून मिळाले होते. आशियाई शेअर बाजारात सुरुवातीच्या व्यवहारात संमिश्र कल दिसून आला. सोमवारी शेअर बाजाराच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात चढ-उतार झाले. रिझर्व्ह बँकेनं गेल्या आठवड्यात लाभांश देण्याची घोषणा केल्यानंतर फायनान्स शेअर्समध्ये तेजी आली, तर एनर्जी कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजार