Join us

Swiggy Share Price : सलग दुसऱ्या दिवशीच्या तेजीनंतर Swiggy चा शेअर आपटला, कंपनीला ३ ते ५ वर्षांत उत्तम वाढीची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 15:30 IST

Swiggy Share Price: शेअर बाजारात एन्ट्रीच्या दिवशी फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स कंपनी स्विगीच्या शेअर्समध्ये दिसलेली तेजी आता कमी झाल्याचं दिसत आहे.

Swiggy Share Price: शेअर बाजारात एन्ट्रीच्या दिवशी फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स कंपनी स्विगीच्या शेअर्समध्ये दिसलेली तेजी आता कमी झाल्याचं दिसत आहे. १३ नोव्हेंबर रोजी स्विगीनं बीएसईवर ५.६४ टक्के प्रीमियमसह ४१२ रुपये आणि एनएसईवर ७.६९ टक्के प्रीमियमसह ४२० रुपयांवर एन्ट्री घेतली. बुधवारी कामकाजाच्या अखेरिस हा शेअर बीएसईवरील ओपनिंग प्राइसपेक्षा १०.६७ टक्क्यांनी आणि आयपीओच्या ३९० रुपयांच्या किमतीपेक्षा जवळपास १७ टक्क्यांनी वधारून ४५५.९५ रुपयांवर बंद झाला. एनएसईवर हा शेअर आयपीओच्या किमतीपेक्षा १७ टक्के आणि ओपनिंग प्राइसपेक्षा ८ टक्क्यांनी वधारून ४५६ रुपयांवर बंद झाला.

आता १४ नोव्हेंबरबद्दल बोलायचं झालं तर स्विगीच्या शेअरचा तेजीसह व्यवहार सुरू झाला, मात्र नंतर त्यात घसरणदिसून आली. बीएसईवर सकाळी हा शेअर ४७२ रुपयांवर उघडला आणि त्यानंतर तो ७ टक्क्यांनी वधारून ४८९.२५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. त्यानंतर तो आधीच्या बंद किमतीच्या तुलनेत ५.६ टक्क्यांनी घसरला आणि ४३०.३० रुपयांच्या नीचांकी पातळीवर गेला.

३ ते ५ वर्षात खूप चांगल्या वाढीची अपेक्षा

स्विगीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीहर्ष माजेटी यांनी शेअर लिस्ट झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना कंपनीला पुढील ३ ते ५ वर्षांत अत्यंत चांगल्या वाढीची अपेक्षा असल्याचं म्हटलं. इन्स्टामार्ट व्यवसाय, स्टोअर नेटवर्कसाठी व्याप्ती वाढविली जात आहे. स्विगीचा ११,३२७.४३ कोटी रुपयांचा आयपीओ एकूण ३.५९ पट सब्सक्राइब झाला होता.

ब्रोकरेजनं सुरू केलं कव्हरेज

जागतिक ब्रोकरेज कंपनी मॅक्वेरी आणि जेएम फायनान्शियलने स्विगीवर कव्हरेज सुरू केलं आहे. मॅक्वेरीनं याला 'अंडरपरफॉर्म' रेटिंग असून शेअरसाठी प्रति शेअर ३२५ रुपये टार्गेट दिलं आहे. जेएम फायनान्शिअलने स्विगीवर ४७० रुपयांच्या टार्गेट प्राइस आणि 'बाय' रेटिंगसह कव्हरेज सुरू केलंय. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :स्विगीइनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार