भारतातील अग्रगण्य इलेक्ट्रिक टू-व्हीलर (Electric Two-Wheeler) उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिकनं (Ola Electric) गुरुवारी आपले पहिलं नॉन-व्हेईकल प्रोडक्ट ओला शक्ती (Ola Shakti) लाँच केलं. हे कंपनीचे रेसिडेन्शियल बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम (BESS) आहे, जे रेसिडेन्शिअल इलेक्ट्रिसिटी स्टोरेज क्षेत्रात ओलाच्या एन्ट्रीचे संकेत देते. दरम्यान, आठवड्याच्या चौथ्या दिवशी ओला इलेक्ट्रिकच्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले. ट्रेडिंगदरम्यान शेअरला ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं आणि भाव ५५ रुपयांच्या पुढे ५५.२० रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक आणि नीचांक अनुक्रमे १०२.५० रुपये आणि ४० रुपयांपेक्षा कमी आहे.
सीईओ काय म्हणाले?
ओला देशामध्ये रिन्युएबल एनर्जी अधिक उपयुक्त बनवण्यासाठी एका मोठ्या एनर्जी स्टोरेज नेटवर्कवर काम करत आहे, ज्यामुळे देशामध्ये निर्माण झालेली अर्धी हरित ऊर्जा नंतरच्या वापरासाठी साठवली जाऊ शकेल. यामुळे ग्रीन एनर्जीच्या पुरवठा आणि मागणीमधील अंतर कमी करण्यास मदत होईल, असं कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल म्हणाले.
ओला इनेक्को चार बॅटरी कॉन्फिगरेशनमध्ये सादर करण्यात आले आहे. यामध्ये १.५ kWh मॉडेलची किंमत ₹२९,९९९, ३ kWh (दोन १.५kWh युनिट्स) ची किंमत ₹५५,९९९, ५.२ kWh मॉडेलची किंमत ₹१,१९,९९९ आणि ९.१ kWh मॉडेलची किंमत ₹१,५९,९९९ ठेवण्यात आली आहे. ही सुरुवातीची किंमत पहिल्या १०,००० युनिट्ससाठी लागू असेल. प्री-बुकिंग ₹९९९ च्या टोकनवर सुरू झाली आहे आणि डिलिव्हरी मकर संक्रांती २०२६ पासून सुरू होईल.
अतिरिक्त भांडवलाची गरज नाही
सिस्टमची बॅटरी एफिशिएंसी ९८% असेल आणि ते १२०–२९० व्होल्ट इनपुट रेंजवर काम करेल. ते दोन तासांत चार्ज केलं जाऊ शकते आणि फुल लोडवर १.५ तासांपर्यंत बॅकअप देण्यास सक्षम असेल. अग्रवाल म्हणाले की, हे उत्पादन पूर्णपणे भारतात डिझाइन, विकसित आणि तयार केले गेले आहे. ओला या बॅटरी सिस्टम्सचे उत्पादन आपल्या तमिळनाडू स्थित गिगाफॅक्टरीमध्ये करेल. अग्रवाल म्हणाले की, या प्रोजेक्टसाठी कंपनीला कोणताही अतिरिक्त भांडवली किंवा आर अँड डीसाठी खर्च करावा लागणार नाही.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Ola Electric launched Ola Shakti, a residential battery energy storage system. Shares surged 5%, reaching ₹55.20. Pre-booking starts at ₹999, with deliveries from Makar Sankranti 2026. No extra capital needed.
Web Summary : ओला इलेक्ट्रिक ने ओला शक्ति, एक आवासीय बैटरी ऊर्जा भंडारण प्रणाली लॉन्च की। शेयर 5% बढ़कर ₹55.20 पर पहुंच गया। प्री-बुकिंग ₹999 से शुरू, मकर संक्रांति 2026 से डिलीवरी। अतिरिक्त पूंजी की आवश्यकता नहीं।