Ola Electric Share : इलेक्ट्रिक टू-व्हीलर क्षेत्रातील मोठी कंपनी Ola Electric Mobility च्या शेअर्समध्ये अलीकडच्या काळात मोठी घसरण पाहायला मिळाली. मात्र, आता या शेअरनी दमदार कमबॅक केले आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीचे शेअर्स ऑल-टाइम हाईपासून ८५% पेक्षा जास्त घसरून अवघ्या २१.२१ रुपयांवर आले होते. मात्र, आता शेअरमध्ये जोरदार तेजी दिसून येत आहे.
आज( २० एप्रिल) रोजी BSE वर ओला इलेक्ट्रिकचा शेअर ४१.५८ रुपयांवर ट्रेड करत होता. म्हणजेच, २१.२१ रुपयांच्या नीचांकी पातळीवरून हा शेअर ९०% पेक्षा जास्त वाढला आहे. यामुळे कंपनीचे मार्केट कॅपही वाढून १८,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे.
ऑल-टाइम हाईपासून मोठी घसरण, आता जोरदार मुसंडी...
ओला इलेक्ट्रिकचा शेअर २० ऑगस्ट २०२४ रोजी १५७.५३ रुपयांच्या उच्चांकावर होता. त्यानंतर सतत घसरत जाऊन २ मार्च २०२६ रोजी तो २१.२१ रुपयांवर आला, जो ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ठरला. मात्र, या पातळीवरून शेअरमध्ये मोठी रिकव्हरी झाली असून, आता तो ९०% पेक्षा जास्त वाढला आहे. सध्या या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ७१.२४ रुपये आहे.
अल्पावधीत जबरदस्त तेजी
३० मार्च २०२६ रोजी हा शेअर ₹२२.८२ वर होता, जो २० एप्रिल २०२६ ₹४१.५८ वर आला आहे. म्हणजेच, केवळ २० दिवसांत या शेअरमध्ये ८०% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. तर, गेल्या एका महिन्यातही शेअरमध्ये सुमारे ७०% तेजी नोंदवली गेली आहे.
IPO पासून आतापर्यंतचा प्रवास
ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचा IPO २ ऑगस्ट २०२४ रोजी खुला झाला आणि ६ ऑगस्टपर्यंत चालला होता. IPO ची किंमत ₹७६ प्रति शेअर होती, तर इश्यू साइज ₹६,१४६ कोटी होता. याची लिस्टिंग ९ ऑगस्ट २०२४ रोजी ₹७५.९९ रुपयांवर झाली. लिस्टिंग दिवशीच हा ₹९१.१८ वर बंद झाला होता. मात्र, त्यानंतर यात घसरण सुरू झाली.
गुंतवणूकदारांसाठी काय संकेत?
जाणकार सांगतात की, ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये दिसणारी ही तेजी “रिलीफ रॅली” किंवा “शॉर्ट कव्हरिंग”मुळे असू शकते. मोठ्या घसरणीनंतर आलेली ही उसळी दीर्घकालीन ट्रेंडची खात्री देत नाही.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Ola Electric shares rebound dramatically, rising 90% from a low of ₹21.21 after an 85% drop from its all-time high. Currently trading at ₹41.58, experts suggest caution, attributing the surge to a potential relief rally rather than a guaranteed long-term trend. Investors should consult financial advisors before investing.
Web Summary : ओला इलेक्ट्रिक के शेयरों में भारी उछाल आया है, जो अपने सर्वकालिक उच्च स्तर से 85% गिरने के बाद ₹21.21 के निचले स्तर से 90% बढ़ा है। वर्तमान में ₹41.58 पर कारोबार कर रहा है, विशेषज्ञ सावधानी बरतने का सुझाव देते हैं, इस उछाल को संभावित राहत रैली बताते हैं, न कि गारंटीकृत दीर्घकालिक प्रवृत्ति। निवेशकों को निवेश करने से पहले वित्तीय सलाहकारों से परामर्श करना चाहिए।