Join us

Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 13:40 IST

Ola Electric Mobility Q1 Results: चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून २०२६) ओला इलेक्ट्रिकचा निव्वळ तोटा सुमारे ४२८ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ तोटा ३४७ कोटी रुपये होता.

Ola Electric Mobility Q1 Results: चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून २०२६) ओला इलेक्ट्रिकचा निव्वळ तोटा सुमारे ४२८ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ तोटा ३४७ कोटी रुपये होता. सोमवार, १४ जुलै रोजी जून तिमाहीचे निकाल जाहीर करताना कंपनीनं ही माहिती दिली. जून तिमाहीत कंपनीचा महसूलही वार्षिक आधारावर ४९.६ टक्क्यांनी घटून ८२८ कोटी रुपयांवर आला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत १,६४४ कोटी रुपये होता.

कंपनीनं संपूर्ण आर्थिक वर्ष २०२६ मध्ये तिचा महसूल ४,२०० कोटी ते ४७०० कोटी रुपयांच्या दरम्यान असण्याचा अंदाज वर्तवला आहे. जर असं झालं तर आर्थिक वर्ष २०२५ पासून कंपनीच्या महसूलात वाढ सकारात्मक असू शकते. कंपनीनं तिचं प्रमाण सुमारे ३.२५ ते ३.७५ लाख युनिट्स असण्याचा अंदाज वर्तवला आहे, ज्यामध्ये तिचं एकूण मार्जिन ३५% ते ४०% दरम्यान असू शकतं.

चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

शेअर्समध्ये १६% वाढ

या अंदाजांमुळे, तिमाही निकालांनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये १६% पर्यंत जोरदार वाढ झाली आणि त्याची किंमत ४३.५७ रुपयांवर पोहोचली. दुपारच्या सुमारास, कंपनीचे शेअर्स १५.४८ टक्क्यांनी वाढून ४६ रुपयांवर व्यवहार करत होते. दरम्यान, या वाढीनंतरही, या वर्षी आतापर्यंत कंपनीचे शेअर्स सुमारे ४७ टक्क्यांनी घसरले आहेत.

तिमाही आधारावर चांगले निकाल

ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचे निकाल तिमाही आधारावर थोडे चांगले राहिले. मार्च तिमाहीत कंपनीला ८७० कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता, जो आता जून तिमाहीत ४२८ कोटी रुपयांवर आला आहे. तिमाही आधारावर कंपनीच्या महसुलातही वाढ झाली. याशिवाय, जून तिमाहीत कंपनीचा ऑटो व्यवसाय EBITDA पातळीवरही नफा कमावला.

"कंपनीच्या ऑटो व्यवसायात जूनमध्ये EBITDA सकारात्मक झाला, जो कंपनीच्या वर्टिकल इंटिग्रेशन स्ट्रॅटजीमुळे मजबूत ग्रॉस मार्जिनमुळे शक्य झाला," असं कंपनीनं १४ जुलै रोजी माध्यमांना दिलेल्या निवेदनाद्वारे म्हटलं.

टॅग्स :ओलाशेअर बाजारगुंतवणूक