Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 15:43 IST

Stock Market Holiday 2026 : एनएसईने पुढील वर्षी शेअर बाजारातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. २०२६ मध्ये शेअर बाजार कोणत्या दिवशी व्यवहारासाठी बंद राहील ते जाणून घेऊया.

Stock Market Holiday 2026 : साल २०२५ आता आपल्या अंतिम टप्प्यात आले आहे. आज, गुरुवार २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस निमित्त भारतीय शेअर बाजारात वर्षातील शेवटची 'ट्रेडिंग सुट्टी' आहे. राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारात आज कोणतेही व्यवहार होणार नाहीत. दरम्यान, गुंतवणूकदारांना नवीन वर्षाचे नियोजन करता यावे यासाठी एनएसईने वर्ष २०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर केली आहे.

आज बाजार पूर्णपणे बंदख्रिसमसच्या सुट्टीमुळे आज इक्विटी, डेरिव्हेटिव्ह्स आणि करन्सी सेगमेंटमध्ये व्यापार बंद आहेत. तसेच मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्येही आज व्यवहार होणार नाहीत. नियमित शनिवार आणि रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्या वगळता, आजची सुट्टी ही या वर्षातील शेवटची सार्वजनिक सुट्टी ठरली आहे.

२०२६ मधील शेअर बाजाराच्या १५ सुट्ट्याएनएसईने जाहीर केलेल्या कॅलेंडरनुसार, आगामी २०२६ सालात एकूण १५ दिवस ट्रेडिंग बंद राहणार आहे. याव्यतिरिक्त दर शनिवार आणि रविवारी साप्ताहिक सुट्टी असेल.

वर्ष २०२६ मधील सुट्ट्यांचे वेळापत्रक

महिना तारीख सुट्टीचे कारण 
जानेवारी२६ जानेवारीप्रजासत्ताक दिन (वर्षातील पहिली सुट्टी)
मार्च३ मार्चहोळी 
मार्च२६ श्री रामनवमी 
मार्च ३१श्री महावीर जयंती
एप्रिल ३ एप्रिल गुड फ्रायडे 
एप्रिल१४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 
मे १ मे महाराष्ट्र दिन 
मे २८ मे बकरी ईद 
जून२६ जूनमुहर्रम
सप्टेंबर १४ सप्टेंबर गणेश चतुर्थी 
ऑक्टोबर२ ऑक्टोबरमहात्मा गांधी जयंती
ऑक्टोबर२० ऑक्टोबरदसरा 
नोव्हेंबर१० नोव्हेंबरदिवाळी - बलिप्रतिपदा
नोव्हेंबर २४ नोव्हेंबर गुरुनानक जयंती
डिसेंबर२५ डिसेंबरख्रिसमस (वर्षातील शेवटची सुट्टी)

वाचा - एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी

महत्त्वाच्या नोंदीनव्या वर्षातील बाजाराची पहिली सुट्टी २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) रोजी असेल, तर वर्षाचा समारोप २५ डिसेंबर (ख्रिसमस) च्या सुट्टीने होईल. या काळात शेअर बाजारासोबतच कमोडिटी आणि करन्सी मार्केटमध्येही सुट्ट्यांचे नियम लागू राहतील. 

English
हिंदी सारांश
Web Title : Attention Investors: Stock Market to be Closed 15 Days in 2026!

Web Summary : NSE releases the 2026 holiday calendar: Stock markets will be closed for 15 days, including Republic Day, Holi, and Christmas. Trading is closed Christmas 2025. Commodity and currency markets also observe these holidays. Plan your investments accordingly.
टॅग्स :स्टॉक मार्केटशेअर बाजारगुंतवणूकसुट्टी