Join us

NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 10:40 IST

NSDL IPO Allotment Status: नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) म्हणजेच एनएसडीएलचा IPO १ ऑगस्ट रोजी बंद झाला. या IPO ला गुंतवणूकदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि तो ४१ पट सबस्क्राइब झाला.

NSDL IPO Allotment Status: नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) म्हणजेच एनएसडीएलचा IPO १ ऑगस्ट रोजी बंद झाला. या IPO ला गुंतवणूकदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि तो ४१ पट सबस्क्राइब झाला. आता गुंतवणूकदार शेअर वाटपाची वाट पाहत आहेत. ५ ऑगस्ट रोजी शेअर अलॉट झालेल्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात शेअर्स जमा केले जातील आणि ज्यांना शेअर्स मिळाले नाहीत त्यांना त्याच दिवशी त्यांचे पैसे परत केले जातील. ग्रे मार्केट आणि सबस्क्रिप्शन डेटा असं दर्शवतात की NSDL चे शेअर्स लिस्टिंगच्या दिवशी चांगला नफा देऊ शकतात. NSDL च्या शेअर्सची संभाव्य लिस्टिंग तारीख ६ ऑगस्ट २०२५ आहे. कंपनीचे शेअर्स BSE वर लिस्ट केले जातील.

एनएसडीएलचा हा ४,०११.६० कोटी रुपयांचा इश्यू पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) होता. आयपीओ सुरू होण्यापूर्वी एनएसडीएलने अँकर गुंतवणूकदारांकडून १,२०१ कोटी रुपये उभारले होते. एलआयसी आणि अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी (एडीआयए) हे देखील अँकर गुंतवणूकदारांमध्ये होते. एनएसडीएल आयपीओचा प्राईज बँड ₹७६० ते ₹८०० होता. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी एका लॉटमध्ये १८ शेअर्स होते.

शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले

अलॉटमेंट कशी चेक कराल?

गुंतवणूकदार दोन प्रकारे ऑनलाइन अलॉटमेंट स्टेटस तपासू शकतात. पहिलं बीएसई वेबसाइटवरून आणि दुसरं रजिस्ट्रारच्या वेबसाइटवरून. प्रथम बीएसई वेबसाइटद्वारे एनएसडीएल आयपीओ अलॉटमेंट स्टेटस तपासण्याची पद्धत जाणून घेऊया.

  • बीएसई वेबसाइट https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx ला भेट द्या
  • इश्यू टाईपमध्ये 'Equity' निवडा
  • इश्यूमध्ये 'National Securities Depository Limited' निवडा
  • तुमचा अर्ज किंवा पॅन नंबर एंटर करा
  • 'I am not a robot' वर टिक करा आणि 'Search' बटणावर क्लिक करा
  • तुमचं एनएसडीएल आयपीओ अलॉटमेंट स्टेटस स्क्रीनवर दिसेल. 

MUFG Intime च्या वेबसाईटवर कसं पाहाल?

  • रजिस्ट्रार वेबसाइट https://in.mpms.mufg.com/Initial_Offer/public-issues.html ला भेट द्या
  • Select Company ड्रॉपडाऊनमध्ये 'National Securities Depository Limited' निवडा
  • पॅन, अर्ज क्रमांक, DP ID किंवा अकाऊंट नंबर यापैकी एक पर्याय निवडा
  • निवडलेल्या पर्यायानुसार माहिती एन्टर करा
  • Search वर क्लिक करा
  • तुमचं एनएसडीएल आयपीओ अलॉटमेंट स्टेटस स्क्रीनवर दिसेल. 

NSDL IPO जीएमपी

एनएसडीएलचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. आज म्हणजेच सोमवार, ४ ऑगस्ट रोजी एनएसडीएलच्या आयपीओचा जीएमपी १२२ रुपये आहे. त्यानुसार, एनएसडीएलच्या शेअर्सची लिस्टिंग इश्यू किमतीपेक्षा सुमारे १५% प्रीमियमवर होऊ शकते.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीपूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूक