Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजारात गुरुवारी (२० फेब्रुवारी) घसरण झाली. निफ्टीच्या वीकली एक्सपायरीनंतर बाजार उघडल्यावर सेन्सेक्स ३०० अंकांनी घसरला. निफ्टीही ७० अंकांनी घसरला. बँक निफ्टी १५० अंकांनी घसरला. ओपनिंगसह निफ्टीवर आयटीसी, मारुती, एअरटेल सारख्या मोठ्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत होती. एचडीएफसी बँकेतील घसरणीमुळे बँक निफ्टीवर दबाव होता. ऑटो आणि एफएमसीजी निर्देशांकात सर्वाधिक घसरण झाली.
सकाळी गिफ्ट निफ्टी जवळपास ५० अंकांनी घसरून २२,९२५ च्या जवळ होता. डाऊ फ्युचर्स ३० अंकांनी घसरले, तर निक्केई ४०० अंकांनी घसरला. काल अमेरिकन बाजारात टॅरिफची भीती असतानाही एस अँड पी ५०० नं सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी उच्चांक गाठला, त्यानंतर डाऊ ७० अंकांनी वधारून ३०० अंकांच्या सुधारणेसह दिवसभराच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला. सलग पाचव्या दिवशी नॅसडॅक १५ अंकांनी वधारला आणि मजबूत राहिला.
ट्रम्प म्हणाले...
दुसरीकडे, ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरमुळे महागाई वाढण्यावर काय परिणाम होईल, याची चिंता फेडला आहे. व्याजदर कपातीसाठी आता महागाई आणि घट आवश्यक असल्याचं फेडचं म्हणणं आहे. ट्रम्प यांची भारताबाबतची कठोर भूमिका दिसून येत आहे. इलॉन मस्क यांना दिलेल्या संयुक्त मुलाखतीत ट्रम्प यांनी भारताला शुल्कात कोणतीही सवलत मिळणार नाही, असं म्हटलं. भारतात टेस्लाचा कारखाना उभारणं चुकीचं ठरेल, असंही त्यांनी मस्क यांना सांगितलं.
युनिफाईड इन्व्हेस्टर अॅप लाँच होणार
याशिवाय आज IREDA आणि Tata Tech देखील F&O मध्ये सामील होणार आहेत. आता एकूण सहा नव्या शेअर्सची एन्ट्री होणार आहे. CDSL आणि NSDL मिळून आज युनिफाईड इन्व्हेस्टर्स अॅप लाँच होणार आहे. गुंतवणूकदारांना एकाच ठिकाणी मार्जिन पोझिशन, ओपन पोझिशन आणि अन्य माहिती मिळेल.