Join us

Nifty थेट शून्यावर, झिरोदामध्ये तांत्रिक बिघाड; नितीन कामथ झाले ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 13:34 IST

Zerodha Down: देशातील सर्वात मोठी रिटेल ब्रोकरेज फर्म झिरोदाला बुधवारी तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. यानंतर अनेकांनी नितीन कामथ यांना ट्रोल केलं.

Zerodha Down: देशातील सर्वात मोठी रिटेल ब्रोकरेज फर्म झिरोदाला बुधवारी तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर स्टॉक आणि व्हॉल्यूम कोट्स दिसत नव्हते, ज्यामुळे गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सनं संताप व्यक्त केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मोठ्या संख्येने युजर्सनं तक्रार केली. तसंच इंडेक्स डेटा आणि लेटेस्ट स्टॉक किमती पाहू शकत नसल्याचंही म्हटलं. या काळात, सेवा खंडित होणं आणि व्यत्ययांबद्दल माहिती देणाऱ्या डाउनडिटेक्टरनं सकाळी ९:४० पर्यंत ८,१४३ तक्रारी नोंदवल्या. दरम्यान, नंतर झिरोदानं एक निवेदन जारी केलं समस्येचं निराकरण करण्यात आलं असून आता प्लॅटफॉर्म सामान्यपणे काम करत असल्याचं म्हटलं.

युजर्ससमोर समस्या

ही चूक बाजार उघडण्याच्या सुरुवातीच्या वेळी झाली, ज्यामुळे अनेक ट्रेडर्सना ट्रेडिंग इक्विटीमध्ये अडचणींना तोंड द्यावं लागलं. इंडेक्स व्हॅल्यू अपडेट होत नव्हते आणि त्याऐवजी ‘nil’ दिसत होतं. तथापि, प्रत्यक्षात बाजाराची परिस्थिती वेगळी होती.

सकाळी १०:३० वाजता, निफ्टी २४,५९८.९० वर व्यवहार करत होता, जो १९.३० अंकांनी किंवा ०.०८% ने वाढ दर्शवत होता. याचा अर्थ असा की अॅपवर डेटा अपडेट होत नसल्यामुळे, गुंतवणूकदारांना बाजारातील प्रत्यक्ष हालचालींबद्दल योग्य माहिती मिळू शकली नाही.

यानंतर अनेक युजर्सनं झिरोदाचे सह-संस्थापक नितीन कामथ यांना ट्रोल केलं. एका युजरनं आपली ट्रेड गेल्यानं आपल्याला पैसे परत हवे असल्याचं म्हटलं. तर आणखी एका युजरनं नितीन कामथ यांना पॉडकास्टवर कमी लक्ष देऊन आपल्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर अधिक लक्ष देण्यास सांगितलं.

टॅग्स :नितीन कामथशेअर बाजार