Join us

बंपर कमाई करुन देणार 'हा' 75 रुपयांचा पीएसयू स्टॉक, ब्रोकरेजने दिले वाढीचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 19:51 IST

NHPC Share Price: कंपनीला नवीन प्रकल्प मिळाले असून, सध्याचे प्रकल्पही पूर्णत्वास आले आहेत.

NHPC Share Price: सरकारी जलविद्युत कंपनी NHPC च्या शेअर्समध्ये गुरुवारी मोठी वाढ झाली. आजच्या व्यवहारात या शेअरमध्ये 8% ची दमदार वाढ नोंदवली गेली. बुधवारी हा स्टॉक 74.60 च्या पातळीवर बंद झाला होता, तर गुरुवारी या शेअरने 80.39 रुपयांचा इंट्राडे उच्चांक गाठला. ग्लोबल ब्रोकरेज फर्म CLSA ने NHPC चे रेटिंग 'Acumulate' वरून 'BUY' वर अपग्रेड केले आहे. 

शेअर दुप्पट होणारब्रोकरेजचा असा विश्वास आहे की, NHPC शेअर्समध्ये पुढील 4 वर्षांत दुप्पट वाढ होण्याची क्षमता आहे. गेल्या 6 महिन्यांत स्टॉकमध्ये 25% ची सुधारणा झाली आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी येथे चांगली संधी बनू शकते.

NHPC साठी मोठा ट्रिगरब्रोकरेजचे म्हणणे आहे की, कंपनीचे नवीन प्रकल्प आणि ROE (रिटर्न ऑन इक्विटी) मधील सुधारणा यासाठी मोठे ट्रिगर ठरू शकतात. NHPC चा भारताच्या जल क्षमतेमध्ये 15% वाटा आहे, तर 67% बांधकामाधीन प्रकल्पांमध्ये आहे. NHPC आता पंप केलेल्या स्टोरेज प्रकल्पांमध्येही पाऊल टाकत आहे, ज्यामुळे कमाई वाढ्याची अपेक्षा आहे. कंपनीचा महत्त्वाचा पार्वती-2 प्रकल्प Q4FY25 मध्ये पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे. 

अक्षय ऊर्जेचा विस्तारNHPC ची अक्षय ऊर्जा ब्रांच पुढील 2 वर्षात शेअर बाजारात लिस्ट होण्याची योजना आहे. यामुळे कंपनीला दीर्घकालीन वाढीचा फायदा होईल आणि गुंतवणूकदारांचा विश्वास बळकट होईल. NHPC शेअर्समध्ये झालेली ही वाढ आणि CLSA च्या सकारात्मक अहवालानंतर गुंतवणूकदारांचा कल शेअर्सकडे वळू शकतो. नवीन प्रकल्प आणि जलविद्युत क्षेत्रातील ताकद यामुळे एनएचपीसीला येत्या काही वर्षांत मोठा नफा मिळण्याची अपेक्षा आहे.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक