Join us

Nephro Care India IPO: शेअर बाजारात 'या' आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, ९०% प्रीमिअम लिस्टिंगनंतर लागलं अपर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 12:05 IST

आयपीओ अंतर्गत ९० रुपयांच्या किंमतीवर शेअर्स जारी करण्यात आले होते. आज एनएसई एसएमईवर शेअर १७१ रुपयांवर पोहोचला आहे.

Nephro Care IPO Listing: कोलकात्यातील हॉस्पिटल नेफ्रो केअर इंडियाच्या शेअर्सनं एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर जोरदार एन्ट्री केली. त्याच्या आयपीओला एकूण ७१५ पट बोली लागली होती. आयपीओ अंतर्गत ९० रुपयांच्या किंमतीवर शेअर्स जारी करण्यात आले होते. आज एनएसई एसएमईवर शेअर १७१ रुपयांवर पोहोचला आहे, म्हणजेच आयपीओ गुंतवणूकदारांना ९० टक्के लिस्टिंग गेन (Nephro Care Listing Gain) मिळाला. लिस्टिंगनंतर शेअरमध्ये आणखी वाढ झाली. कंपनीचा शेअर १७९.५५ रुपयांच्या (Nephro Care Share Price) अपर सर्किटवर गेला म्हणजेच आयपीओ गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला.

२८ जूनला उघडलेला आयपीओ

आयपीओचा आकार ४१.२६ कोटी रुपये आहे. कंपनीने आयपीओच्या माध्यमातून ४५.८४ लाख शेअर्स जारी केले आहेत. नेफ्रो केअर इंडियाचा आयपीओ २८ जून रोजी गुंतवणूकदारांसाठी खुला करण्यात आला. हा आयपीओ २ जुलै पर्यंत खुला होता. आयपीओसाठी कंपनीने तब्बल १६०० शेअर्सचा एक लॉट तयार केला होता. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १ लाख ४४ हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागणार होती.

कंपनीचा आयपीओ २७ जून रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला करण्यात आला होता. कंपनीनं अँकर गुंतवणूकदारांच्या माध्यमातून ११.१५ कोटी रुपये उभे केले. कंपनीनं अँकर गुंतवणूकदारांना जारी केलेल्या ५० टक्के शेअर्सचा लॉक-इन पीरिअड २ ऑगस्ट २०२४ निश्चित केला आहे. उर्वरित ५० टक्के रक्कम १ ऑक्टोबर २०२४ पर्यंत होल्ड करावी लागणार आहे. कंपनीनं गुंतवणूकदारांना ९० रुपये प्रति शेअर या दरानं शेअर्सचं वाटप केलं आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार