Join us
Daily Top 2Weekly Top 5

दोन शेअरवर १ बोनस शेअर देतेय 'ही' कंपनी, ३ महिन्यांत पैसे केले दुप्पट; आता अपर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 12:33 IST

कंपनीच्या शेअर्सच्या किमती केवळ 3 महिन्यांत 100 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. आता त्यांनी बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतलाय.

Bonus Stocks 2024: गेल्या काही दिवसांमध्ये काही शेअर्सनं जबरदस्त कामगिरी केली आहे. Naapbooks Ltd ही अशा कंपन्यांपैकी एक आहे ज्यांनी गेल्या काही महिन्यांत चमकदार कामगिरी केलीये. कंपनीच्या शेअर्सच्या किमती केवळ 3 महिन्यांत 100 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. दरम्यान, कंपनीनं आता बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतलाय. 

एका शेअरवर 2 बोनस शेअर  

कंपनीनं स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत म्हटलंय की 10 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या प्रत्येक 2 शेअर्ससाठी 1 शेअर बोनस म्हणून दिला जाईल. या बोनस इश्यूसाठी कंपनीने अद्याप रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही. दरम्यान, कंपनीनं म्हटलं की बोनस जारी केल्याच्या 2 महिन्यांच्या आत ते पात्र गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा केलं जाईल. अशा परिस्थितीत कंपनी येत्या काही दिवसांत रेकॉर्ड डेटही जाहीर करेल अशी अपेक्षा आहे.  

कंपनीची उत्तम कामगिरी 

गुरुवारी कंपनीच्या शेअर्सला 5 टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. त्यानंतर कंपनीच्या शेअर्सची किंमत 240.45 रुपयांच्या पातळीवर पोहोचली. हा कंपनीचा नवा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर आहे. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 39 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, 3 महिन्यांपासून शेअर्स होल्ड केलेल्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत 122.30 टक्क्यांचा लाभ मिळालाय. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक