Muthoot Finance Shares: पहिल्या तिमाहीतील जबरदस्त निकालांनंतर, मुथूट फायनान्सच्या शेअर्समध्ये मोठी तेजी आली आहे. गुरुवारी बीएसईमध्ये गोल्ड लोन फायनान्सिंग कंपनीचे शेअर्स ११ टक्क्यांहून अधिक वाढून २७९९ रुपयांवर पोहोचले. मुथूट फायनान्सच्या शेअर्सनी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांकही गाठला. अनेक ब्रोकरेज हाऊसेसनी कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राईज वाढवली आहे. मुथूट फायनान्सच्या शेअर्सना २९५० रुपयांचं टार्गेट देण्यात आलं. कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १७५१.५० रुपये आहे.
२९५० रुपयांचं टार्गेट
ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीनं मुथूट फायनान्सच्या शेअर्सचे रेटिंग अपग्रेड केलं आहे. ब्रोकरेज हाऊसनं गोल्ड लोन फायनान्सिंग कंपनीच्या शेअर्सना ओव्हरवेट रेटिंग दिलंय. मॉर्गन स्टॅनलीनं यापूर्वी मुथूट फायनान्सच्या शेअर्सना इक्वलवेट रेटिंग दिलं होतं. ब्रोकरेज हाऊसने कंपनीच्या शेअर्सची टार्गेट किंमत देखील वाढवली आहे. मॉर्गन स्टॅनलीनं मुथूट फायनान्सच्या शेअर्सची टार्गेट प्राईज ८८० रुपयांवरून २९२० रुपये केली आहे.
लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
नफा ९०% नं वाढला
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मुथूट फायनान्सचा नफा ९०% नं वाढून २०४६ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत गोल़्ड लोन देणाऱ्या कंपनीला १०७९ कोटी रुपये नफा झाला होता. कर्जाची मागणी वाढल्यामुळे कंपनीच्या नफ्यात ही वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर ५४% नं वाढून ५७०३ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीचा महसूल ३७०४ कोटी रुपये होता.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)