Join us

'या' मल्टीबॅगर शेअरने दिले बंपर रिटर्न्स; फक्त 3 वर्षात 1 लाखाचे झाले 2.6 कोटी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 18:25 IST

Multibagger Stock: शेअर मार्केटमध्ये अनेक मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत, जे गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न्स मिळवून देतात.

Multibagger Stock: शेअर मार्केटमध्ये अनेक मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत, जे गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न्स मिळवून देतात. यापैकी अनेक असे आहेत, ज्यात पैसे गुंतवून लोक कोट्यधीश झालेत. यातील एक स्टॉक आहे इंटिग्रेटेड टेक्नॉलॉजीचा. या स्टॉकने फक्त 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न्स दिले आहेच.

या शेअरचा इतिहास पाहिला तर गेल्या काही वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली. इंटिग्रेटेड टेक्नॉलॉजीच्या शेअर्सनी केवळ 3 वर्षात गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहेत. 73.90 रुपये मार्केट कॅप असलेल्या या कंपनीने या 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 26 हजार टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

कंपनीचे शेअर्स 21 जून 2023 रोजी बीएसईवर 154.55 रुपयांवर व्यवहार करत होते. 3 वर्षांपूर्वी, 5 जून 2020 रोजी बीएसईवर या शेअर्सची किंमत फक्त 0.59 रुपये होती. म्हणजेच, गेल्या 3 वर्षात या शेअरची किंमत जवळपास 26,059 टक्क्यांनी वाढली आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये तीन वर्षांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते आणि ती गुंतवणूक आजपर्यंत कायम ठेवली असती, तर त्याची किंमत 2.6 कोटी रुपये झाली असती.

 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक