Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेअर असावा तर असा...₹१ लाखाचे केले ₹१४ कोटी; गुंतवणूकदारांना मिळाला १,४०० पट परतावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 14:49 IST

Multibagger Stock: ही कंपनी शेअरच्या वाढीसाठीच नव्हे, तर मजबूत डिव्हिडंड देण्यासाठीही ओळखली जाते.

Multibagger Stock:शेअर बाजारात असे काही मोजकेच स्टॉक्स आहेत, ज्यांनी दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. अशाच एका मल्टीबॅगर शेअरची सध्या बाजारात जोरदार चर्चा आहे. उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्या हिंदुस्तान झिंक लिमिटेड (Hindustan Zinc Ltd) या कंपनीने गेल्या २४ वर्षांत गुंतवणूकदारांना तब्बल १४०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. या शेअरमध्ये २००२ साली गुंतवलेले ₹१ लाख आज कोट्यवधी रुपये झाले आहेत.

₹१ लाखांचे झाले ₹१४ कोटी

हिंदुस्तान झिंकच्या शेअरने गेल्या दोन दशकांत जबरदस्त वाढ नोंदवली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, २००२ मध्ये कंपनीत ₹१ लाखांची गुंतवणूक केली असती, तर मे २०२६ पर्यंत त्या गुंतवणुकीचे मूल्य सुमारे ₹१४ कोटींवर पोहोचले असते. कंपनीने गेल्या २४ वर्षांत सरासरी सुमारे ३३ टक्के CAGR (Compound Annual Growth Rate) परतावा दिला आहे, जो दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अत्यंत उल्लेखनीय मानला जातो.

सरकारी कंपनीपासून जागतिक दिग्गजापर्यंतचा प्रवास

हिंदुस्तान झिंक ही सुरुवातीला सरकारी मालकीची कंपनी होती. २००२ साली केंद्र सरकारने कंपनीतील २६ टक्के हिस्सा अनिल अग्रवाल यांच्या ‘स्टरलाइट इंडस्ट्रीज’ला ₹४४५ कोटींमध्ये विकला. नंतर स्टरलाइट ही वेदांता समूहाचा भाग बनली आणि हिंदुस्तान झिंकने जागतिक स्तरावर मोठी झेप घेतली. आज हिंदुस्तान झिंक ही जगातील सर्वात मोठ्या चांदी उत्पादक कंपन्यांपैकी एक मानली जाते.

डिव्हिडंड देण्यातही कंपनी आघाडीवर

हिंदुस्तान झिंक केवळ शेअरच्या वाढीसाठीच नव्हे, तर मजबूत डिव्हिडंड देण्यासाठीही ओळखली जाते. कंपनी नियमितपणे आपल्या नफ्याचा मोठा हिस्सा भागधारकांमध्ये वाटते.

कंपनीचा डिव्हिडंड इतिहास :
२०२६-२७ : ₹११ प्रति शेअर पहिला डिव्हिडंड जाहीर
२०२५-२६ : ₹१० प्रति शेअर डिव्हिडंड
२०२४-२५ : दोन टप्प्यांत (₹१० + ₹१९) मिळून ₹२९ डिव्हिडंड
२०२३-२४ : ₹१३ प्रति शेअर (₹७ + ₹६) डिव्हिडंड वितरण
सध्याची डिव्हिडंड यिल्ड किती?

सध्या कंपनीच्या शेअरची किंमत ₹६३० ते ₹६४५ दरम्यान व्यवहार करत आहे. या आधारावर कंपनीची डिव्हिडंड यिल्ड अंदाजे ३.२६ टक्के ते ३.४७ टक्क्यांच्या दरम्यान आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Hindustan Zinc's stock turns ₹1 lakh into ₹14 crore.

Web Summary : Hindustan Zinc delivered massive 1400% returns in 24 years, turning a ₹1 lakh investment made in 2002 into ₹14 crore. Formerly government-owned, the company became a global leader after Sterlite acquired a stake. It's known for consistent dividends.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक