Join us

गुंतवणूकदार मालामाल; शेअरने ३ महिन्यांत पैसे केले डबल, आज १५% वाढ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 15:48 IST

Multibagger Stock: या शेअरची किंमत २०० रुपयांपेक्षा कमी आहे.

Multibagger Stock: ट्रम्प टॅरिफमुळे भारतीय शेअर बाजारात बरचा चढ-उतार पाहायला मिळत आहे. अशा वातावरणात नेलकास्टच्या (Nelcast) शेअर्समध्ये मोठी वाढ पाहायल मिळत आहे. आज हा शेअर १५ टक्क्यांहून अधिक वाढला अन् बीएसईवर १७९.१५ रुपयांच्या इंट्रा-डे उच्चांकावर पोहोचला. विशेष म्हणजे, अवघ्या ३ महिन्यांतच या स्मॉल कॅप स्टॉकने गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा दिला आहे.

३ महिन्यांपूर्वी कंपनीच्या शेअर्सची किंमत ८६.३६ रुपये होती. जी आज १७९.१५ रुपयांच्या इंट्रा-डे उच्चांकावर पोहोचली. म्हणजेच कंपनीच्या शेअर्सची किंमत १०७ टक्क्यांनी वाढली आहे. ही कंपनीची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी आहे. तर, कंपनीची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ७८ रुपये आहे.

तिमाही निकाल जाहीर एप्रिल ते जून या कालावधीत या कंपनीचा कर भरल्यानंतरचा नफा १२.५ कोटी रुपये होता. जो वार्षिक आधारावर ५७.२ टक्क्यांनी वाढला आहे. एका वर्षापूर्वी, त्याच तिमाहीत या मल्टीबॅगर स्टॉकचा नफा ८ कोटी रुपये होता. महसुलाबद्दल बोलायचे झाले तर, नेलकास्टने वार्षिक आधारावर ११.१ टक्के वाढ केली. पहिल्या तिमाहीत कंपनीचा एकूण महसूल ३३६ कोटी रुपये होता. वार्षिक आधारावर EBITDA मध्ये ४४.३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीचा EBITDA ३२.४० कोटी रुपये होता.

(टीप- शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक