Multibagger Stock: क्रिकेटच्या सामन्यासारखं शेअर बाजारात कधी काय होईल सांगता येत नाही. इथं दिग्गज कंपन्यांचे शेअर्स कधी-कधी आपटतात तर एखादी छोटी कंपनी तुम्हाला काही दिवसांत मालामाल करते. त्यामुळे गुंतवणूकदारांना नेहमीच सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. विशेषतः नवीन गुंतवणूकदारांसाठी, बाजारातील चढ-उतार समजून घेणे आव्हानात्मक असते. बाजारात यशस्वी व्हायचे असेल तर, केवळ सावधगिरीच नाही तर 'संयम' देखील तितकाच महत्त्वाचा असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका 'मल्टीबॅगर' स्टॉकबद्दल सांगणार आहोत, ज्याने केवळ एका वर्षात गुंतवणूकदारांवर पैशांचा अक्षरशः पाऊस पाडला आहे.
या 'श्रीमंत' करणाऱ्या स्टॉकच्या कंपनीचे नाव आहे एलीटकॉन इंटरनॅशनल लिमिटेड, जी प्रामुख्याने तंबाखू व्यवसायाशी संबंधित आहे.
फक्त एका वर्षात १ लाखाचे झाले ५० लाख!
- गेल्या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, म्हणजेच शुक्रवारी (७ जून रोजी), हा शेअर ५% वाढीसह ५७१.०५ रुपयांच्या पातळीवर बंद झाला, जो त्याचा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे.
- तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण या शेअरची किंमत कधीकाळी फक्त ११ रुपये होती! पण एका वर्षाच्या आत, त्याने गुंतवणूकदारांना ५००० टक्के (५० पट) जबरदस्त परतावा देऊन मालामाल केले आहे.
- गेल्या आठवड्यातच, हा शेअर सुमारे २७ टक्क्यांनी वाढला, तर एका महिन्यात तो सुमारे ५७ टक्क्यांनी वाढला आहे.
गुंतवणुकीचे आकडे सांगतायेत 'श्रीमंतीची' कहाणी
- एलीटकॉन इंटरनॅशनल लिमिटेडच्या शेअरमध्ये गुंतवणूक केलेल्यांना मिळालेला परतावा पाहिल्यास, या स्टॉकने खऱ्या अर्थाने गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे:
- जर एखाद्या गुंतवणूकदाराने सहा महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये १ लाख गुंतवले असते, तर आज त्याची किंमत सुमारे ७.५ लाख रुपये झाली असती. म्हणजेच, फक्त सहा महिन्यांत १ लाखांच्या गुंतवणुकीवर ६.५ लाख रुपयांचा निव्वळ नफा (६५५% परतावा) मिळाला आहे.
- याहूनही धक्कादायक म्हणजे, जर एखाद्याने एक वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख गुंतवले असते, तर ५००० टक्क्यांहून अधिक परतावा मिळाल्यानंतर आज त्याचे मूल्य तब्बल ५० लाख रुपये झाले असते!
वाचा - चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
एका वर्षापूर्वी ज्या शेअरची किंमत ११ रुपये होती, तो आता ५७१ रुपयांपेक्षा जास्त किमतीवर व्यवहार करत आहे. अर्थातच, हा शेअर गुंतवणूकदारांना उत्तम परतावा मिळवण्याची एक जबरदस्त संधी ठरला आहे. मात्र, शेअर बाजारातील गुंतवणूक ही नेहमीच जोखमीच्या अधीन असते, त्यामुळे अशा मल्टीबॅगर स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते.