Join us

८ दिवसांत १००% परतावा, आता कंपनीने जाहीर केला आहे लाभांश; आज शेअर्स ७% ने वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 16:27 IST

Multibagger Stock: या बजाज ग्रुपच्या शेअरमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

Multibagger Stock:शेअर बाजारातीलगुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे, पण कधीकधी काही शेअर्स गुंतवणूकदारांना दमदार परतावा देतात. अशाच शेअर्सपैकी काही शेअर्सनी फक्त ८ दिवसांत गुंतवणूकदारांना १०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. त्यापैकी इंडेफ मॅन्युफॅक्चरिंग (Indef Manufacturing) ही एक आहे. कंपनीच्या शेअर्सची किंमत आज ७ टक्क्यांहून अधिक वाढली आहे. 

आज(सोमवारी) बीएसईमध्ये बजाज ग्रुपच्या या कंपनीचा शेअर ४६४.९० रुपयांच्या वाढीसह उघडला. परंतु दिवसभरात, शेअर ४८०.१० रुपयांच्या इंट्रा-डे उच्चांकावर पोहोचला. बीएसईमध्ये हा कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे.

८ दिवसांत शेअर्स १००% वाढले

४ जून २०२५ रोजी इंडेफ मॅन्युफॅक्चरिंगच्या शेअर्सची किंमत २३९.७० रुपयांच्या पातळीवर होती, जी आज ४८०.१० रुपयांच्या पातळीवर पोहोचली. म्हणजेच, कंपनीच्या शेअर्सच्या किमती फक्त ८ दिवसांत १०० टक्के वाढली आहे. पोझीशनल गुंतवणूकदारांना या शेअरने मालामाल केले आहे. कंपनीचे मार्केट कॅप १४४९.२८ कोटी रुपये आहे. ही कंपनी होस्टिंग आणि मटेरियल हँडलिंग सोल्यूशन्स प्रदान करते. कंपनीला ६० वर्षांचा अनुभव असून, पूर्वी या कंपनीचे नाव बजाज इंडेफ होते.

कंपनीने जाहीर केला लाभांश इंडिफ मॅन्युफॅक्चरिंगने गुंतवणूकदारांना लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने म्हटले की, एका शेअरवर २ रुपये लाभांश दिला जाईल. या लाभांशासाठी कंपनीने ५ ऑगस्ट २०२५ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. बजाज ग्रुपची ही कंपनी या वर्षी २६ फेब्रुवारी रोजी बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध झाली होती. 

कंपनीत कोणाचा किती हिस्सा आहे?ट्रेंडलीनच्या आकडेवारीनुसार, या कंपनीत प्रवर्तकाचा(बजाज ग्रुप) हिस्सा ६९.६० टक्के आहे. तर, एफआयआयकडे १.६ टक्के हिस्सा आहे. तसेच, कंपनीमध्ये एकूण सार्वजनिक हिस्सा २८.८० टक्के आहे. 

(टीप-हा गुंतवणूक सल्ला नाही. शेअर बाजार जोखमीच्या अधीन आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक