Join us

Multibagger Share: 5 रुपयांच्या शेअरने केले मालामाल, सहा महिन्यात 1 लाखाचे झाले 15 लाख...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 15:48 IST

Globe Commercials Share Price: शेअर बाजारात काही पेनी स्टॉक गुंतवणूकदारांना मोठी कमाई करुन देतात.

Share Market Tips:शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. गेल्या गेल्या काही महिन्यांत काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. एका 5 रुपयांच्या पेनी स्टॉकने सहा महिन्यांत गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. ज्या गुंतवणूकदाराने सहा महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील, त्याला आज 15 लाख रुपये मिळातील असते. 

5 रुपयांवरुन 39 रुपयांवर झेप

ग्लोब कमर्शियल(Globe Commercials Limited) नावाची कंपनी अॅग्रीकल्चर कमोडिटीज आणि ई-कॉमर्स सोल्यूशन्समध्ये व्यवहार करते. या कंपनीचा स्टॉक सहा महिन्यांत 5 रुपयांवरुन 39 रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीने गेल्या सहा महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स दिले आहेत. सहा महिन्यांपूर्वी(7 ऑक्टोबर 2022) रोजी बीएसईवर ग्लोब कमर्शियलचा शेअर रु.5 वर होता. त्यावेळी एखाद्या गुंतवणूकदाराने कंपनीच्या शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर त्याला 20 हजार शेअर्स मिळाले असते.

बोनस शेअर्स 1:1 च्या प्रमाणात दिले यानंतर, Globe Commercials ने जानेवारी 2023 मध्ये स्टॉकमध्ये गुंतवणूक केलेल्यांना 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स दिले. बोनस शेअर्स मिळाल्यानंतर 20000 शेअर्स वाढून 40000 झाले. आता हा शेअर बुधवारी बंद झालेल्या सत्रात 39 रुपयांच्या पातळीवर गेला आहे. आज 40000 शेअर्सची किंमत 39 रुपये दराने 15.60 लाख रुपये झाली आहे.

शेअर्स 400% पेक्षा जास्त वाढले13 एप्रिल 2022 रोजी ग्लोब कमर्शियलचा शेअर 7.68 रुपयांच्या पातळीवर होता. 12 एप्रिल 2023 रोजी हा रु.39 पर्यंत वाढला आहे. अशाप्रकारे गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअरमध्ये 407 टक्के वाढ झाली आहे. ग्लोब कमर्शियल शेअरची 52 आठवड्यांची उच्च पातळी 52.60 रुपये आहे आणि शेअरची निम्न पातळी 4.54 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 23.5 कोटी रुपये आहे.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूकव्यवसाय