Join us

सरकारी शेअरने दिला बंपर परतावा; दोन वर्षांत 1 लाखचे झाले 10 लाख रुपये...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 19:55 IST

Multibagger PSU Stocks : सरकारच्या विविध प्रयत्नांमुळे सरकारी कंपन्यांचे शेअर्स पुनरागमन करत आहेत.

Multibagger PSU Stocks :शेअर बाजारात फक्त खासगी कंपन्याच नाही, तर सरकारी कंपन्यादेखील गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतात. सरकारी कंपन्यांच्या शेअर्सना PSU शेअर्स म्हणतात. गेल्या काही काळापासून BSE चा PSU निर्देशांक झपाट्याने वाढतोय. केवळ एका वर्षात हा निर्देशांक जवळपास 100% वाढला असून, PSU शेअर्सच्या किमतीत झपाट्याने वाढ झाली आहे. एका रिपोर्टनुसार, तीन PSU कंपन्यांच्या शेअर्सनी दोन वर्षांत प्रचंड नफा दिला आहे. तुम्ही या कंपन्यांमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज तुम्हाला सुमारे 10 लाख रुपयांचा परतावा मिळाला असता. 

Mazagon डॉक शिपबिल्डर्स सूसाटया कंपन्यांमध्ये माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. या शेअरची किंमत जून 2024 पर्यंत 234.85 रुपयांवरुन 3,968.25 रुपयांपर्यंत वाढली आहे. त्यानुसार, या शेअरमध्ये 1,590% वाढ झाली आहे. कोचीन शिपयार्ड आणि रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) ने देखील 1,000% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर, तुम्ही दोन वर्षांपूर्वी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज तुम्हाला 10 लाख रुपये मिळाले असते.

अनेक PSU कंपन्यांना फायदा सरकारी प्रयत्नांमुळे PSU शेअर्स दमदार पुनरागमन करत आहेत. या प्रयत्नांमध्ये उत्तम पायाभूत सुविधा, अधिक सरकारी खर्च आणि चांगल्या प्रशासनाचा समावेश आहे. अनेक PSU कंपन्यांना याचा फायदा झाला आहे. यांच्या शेअर्सच्या किमती 500% ते 950% पर्यंत वाढल्या आहेत. उदा. फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, या कंपन्यांच्या शेअर्समध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. एकूणच BSE सेन्सेक्स अलीकडच्या काळात 50% ने वाढला आहे, तर PSU कंपन्यांचा हिस्सा 10.5% वरून आर्थिक वर्षात 17.5% पर्यंत वाढला आहे.

(टीप- हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक