Join us
Daily Top 2Weekly Top 5

१ रूपयाच्या शेअरची कमाल, १ लाखांचे झाले ६.३९ कोटी; गुंतवणूकदारांना ६३८८३ टक्क्यांचे रिटर्न्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 20:38 IST

हा शेअर १ रुपयांवरून ७६७ रुपयांवर पोहोचला. या कालावधीत त्याने आपल्या भागधारकांना ६३,८८३ टक्क्यांचे मल्टीबॅगर रिटर्न्स दिले आहेत.

Multibagger Stock: UPL लिमिटेड ही केमिकल उद्योगातील एक मोठी कंपनी आहे. त्या कंपनीचे मार्केट कॅप 58,671.05 कोटी रूपये आहे. युपीएल लिमिटेडच्या शेअर्सनं दीर्घ कालावधीत त्यांच्या गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. गेल्या 20 वर्षात हा शेअर 1 रुपयांवरून 767 रुपयांपर्यंत वाढला आहे. युपीएल लिमिटेडने या कालावधीत 63,883.33 टक्क्यांचे मल्टीबॅगर रिटर्न दिले आहे.

शुक्रवारी NSE वर युपीएल लिमिटेडचे ​​शेअर्स 767.80 रुपये प्रति शेअर वर ट्रेडिंग करत होते. 5 जुलै 2002 रोजी स्टॉकची किंमत 1.20 रूपये होती. म्हणजेच, या कालावधीत, सुमारे 20 वर्षांमध्ये या शेअरने 63,883.33 टक्के इतका मल्टीबॅगर परतावा दिला आहे. अशाप्रकारे, जर एखाद्या व्यक्तीने 20 वर्षांपूर्वी युपीएल लिमिटेडच्या शेअर्समध्ये 1 लाख रूपये गुंतवले असतील, तर आज त्याचं मूल्य 6.39 कोटी रूपये असेल. गेल्या पाच वर्षांत स्टॉक 38.31 टक्के आणि मागील वर्षाच्या तुलनेत 6.79 टक्क्यांनी वाढला आहे.

गेल्या 6 महिन्यांत स्टॉकमध्ये 9.04 टक्के आणि गेल्या 1 महिन्यात 8.91 टक्के वाढ झाली आहे. स्टॉकने 4 मे 2022 रोजी 848.00 रूपयांची 52-आठवड्यांची उच्चांकी पातळी गाठली होती. तर 23 जून 2022 रोजी NSE वर 607.50 रूपये ही नीचांकी पातळीही गाठली.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक