Join us

9 दिवसांत पैसे दुप्पट, MTNL च्या शेअरने गाठला इंट्राडे उच्चांक; गुंतवणूकदार मालामाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 17:11 IST

MTNL Share: MTNL च्या शेअरने गेल्या वर्षभरात 345% परतावा दिला आहे.

MTNL Share : गेल्या काही दिवसांपासून महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, म्हणजेच MTNL चे शेअर्स फोकसमध्ये आले आहेत. आजही कंपनीच्या शेअरमध्ये 5% अप्पर सर्किट लागले अन् हा शेअर 88.06 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला. हा या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. विशेष म्हणजे, MTNL च्या शेअर्समध्ये गेल्या 9 दिवसांपासून अप्पर सर्किट लागत आहे. तसेच, या काळात हा शेअर जवळपास 100% वधारला आहे.

शेअर्स वाढण्याचे कारणएमटीएनएलच्या शेअर्समध्ये वाढ होण्यामागे एक मोठे कारण आहे. या महिन्याच्या सुरुवातीला कंपनीची थकबाकी त्वरित भरण्यासाठी सरकारने 92 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. याशिवाय, केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने MTNL बाँडच्या मूळ रकमेच्या परतफेडीसाठी 3,668.97 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. दूरसंचार मंत्रालयाच्या अंतर्गत दूरसंचार प्रकल्प आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांसाठी सरकारने 1.28 लाख कोटी रुपयांची तरतूद केली. एकूण निधीपैकी 1 लाख कोटी रुपयांहून अधिक BSNL आणि MTNL संबंधित खर्चांसाठी आहे.

शेअर्सची स्थितीMTNL च्या शेअरने गेल्या एका महिन्यात जवळपास 109% आणि तीन महिन्यांत 136% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. तर, या PSU स्टॉकने एका वर्षात 345% परतावा दिला आहे.

(टीप- शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक