Finbud Financial Services : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम. एस. धोनीचे समर्थन असलेली फिनबड फायनान्शियल सर्व्हिसेस या फिनटेक कंपनीने आपला आरंभिक सार्वजनिक ऑफर लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या ७१.६८ कोटींच्या आयपीओसाठी प्रति शेअर १४० ते १४२ रुपये असा प्राइस बँड निश्चित केला आहे.
पीटीआयच्या अहवालानुसार, हा आयपीओ ६ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०२५ पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल. महत्त्वाचे म्हणजे, अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली ४ नोव्हेंबर रोजी एका दिवसासाठी खुली राहणार आहे.
आयपीओची मुख्य माहितीप्राइस बँड : १४० ते १४२ रुपये प्रति शेअरएकूण रक्कम: ७१.६८ कोटी रुपये (उच्चतम प्राइस बँडवर)समभागांची संख्या: ५०.४८ लाख नवीन इक्विटी शेअर्सआयपीओमधून मिळालेला निधी कंपनी आपली खेळती भांडवलाची गरज, एलटीसीव्ही क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेड या उपकंपनीमधील गुंतवणूक, व्यवसाय विकास, विपणन घडामोडी आणि कर्ज परतफेड यासाठी वापरेल. उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरली जाईल.
'फायनान्स बुद्धा'चे सह-संस्थापक पराग अग्रवाल यांनी सांगितले की, "आम्ही सार्वजनिक बाजारात प्रवेश करत आहोत. जबाबदारीने व्यवसाय विस्तारणे, प्रशासनाला बळकटी देणे आणि आमचे ग्राहक, भागीदार व गुंतवणूकदार यांच्यासाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्यावर आमचे लक्ष आहे."
'फायनान्स बुद्धा'चे आणखी एक सह-संस्थापक विवेक भाटिया म्हणाले की, "आम्ही उदयनोमुख बाजारपेठांमध्ये आपली उपस्थिती वाढवणे, एजंट नेटवर्क मजबूत करणे आणि जलद आणि विश्वासाने क्रेडिट सोल्यूशन्स प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत."
गुंतवणूकदार आणि बॅकर्सफिनबड फायनान्शियल सर्व्हिसेसला क्रिकेटपटू एम. एस. धोनीच्या कुटुंबाच्या कार्यालयासह आशिष कचोलिया आणि शंकर व्ही (CAMS चे संस्थापक) यांसारख्या प्रमुख गुंतवणूकदारांचे समर्थन लाभले आहे. यावरून कंपनीच्या तंत्रज्ञान क्षमतांवर आणि रिटेल क्रेडिट देण्याच्या दृष्टिकोनावर गुंतवणूकदारांचा विश्वास दिसून येतो.
आर्थिक आणि लिस्टिंगची माहितीकंपनीने आर्थिक वर्ष २०२५ मध्ये २२३ कोटी रुपये इतके एकूण उत्पन्न आणि ८.५ कोटी रुपये इतका निव्वळ नफा नोंदवला आहे. कंपनीचे शेअर्स NSE Emerge प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले जातील. अंदाजित लिस्टिंग तारीख १३ नोव्हेंबर २०२५ असेल.
या आयपीओसाठी SKI Capital Services हे एकमेव बुक रनिंग लीड मॅनेजर आहे, तर स्कायलाईन फायनान्शियल सर्व्हिसेस हे रजिस्ट्रार आहे.
Web Summary : Finbud Financial Services, supported by MS Dhoni, launches ₹71.68 crore IPO on November 6, with a price band of ₹140-₹142. Funds will support working capital and business development. Shares list on NSE Emerge around November 13.
Web Summary : एमएस धोनी द्वारा समर्थित फिनबड फाइनेंशियल सर्विसेज ने 71.68 करोड़ रुपये का आईपीओ 6 नवंबर को लॉन्च किया, जिसका प्राइस बैंड 140-142 रुपये है। धन का उपयोग कार्यशील पूंजी और व्यवसाय विकास के लिए किया जाएगा। शेयर लगभग 13 नवंबर को एनएसई इमर्ज पर सूचीबद्ध होंगे।