Top 5 Stock Picks :शेअर बाजारात सध्या कंपन्यांच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालांचा हंगाम जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ब्रोकरेज फर्म 'मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस'ने गुंतवणूकदारांसाठी ५ महत्त्वाचे समभाग निवडले आहेत. देशांतर्गत मागणीतील वाढ, कंपन्यांचा विस्तार आणि जागतिक धोरणे पाहता टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट आणि एंजल वन यांसारख्या कंपन्या मध्यम ते दीर्घ मुदतीत गुंतवणूकदारांची 'चांदी' करू शकतात.
१. टाटा स्टील, टार्गेट प्राईस : २२० रुपयेटाटा स्टील सध्या एका मजबूत टप्प्यात प्रवेश करत आहे. भारतात पोलादाची वाढती मागणी आणि आयातीवर आलेले निर्बंध यामुळे किमतींना चांगला आधार मिळाला आहे. महत्त्वाचे म्हणजे, कंपनीच्या युरोपातील कामकाजात सुधारणा होत असून, २०२६ च्या चौथ्या तिमाहीपर्यंत ब्रिटनमधील व्यवसाय तोटा विरहित होईल, असा अंदाज आहे.
२. अल्ट्राटेक सिमेंट, टार्गेट प्राईस : १३,६५० रुपयेसिमेंट क्षेत्रातील हा दिग्गज खेळाडू आपल्या क्षमता विस्तारासाठी सज्ज आहे. कंपनीने २२.८ mtpa क्षमतेचा 'फेज ४' विस्तार जाहीर केला असून, उत्पादन क्षमता १४८ mtpa (दशलक्ष टन प्रति वर्ष) वर नेली आहे. यामुळे २०२८ पर्यंत २०० mtpa चे उद्दिष्ट वेळेआधीच पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा ७५% नी वाढला असून बाजारातील हिस्सा २८% वरून ३३% पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
३. एंजल वन, टार्गेट प्राईस : ३,४०० रुपयेएंजल वनने तिसऱ्या तिमाहीत अपेक्षेनुसार कामगिरी केली आहे. केवळ शेअर ब्रोकिंगवर अवलंबून न राहता कंपनीने कमॉडिटी, म्युच्युअल फंड वितरण आणि कर्ज वितरण यामध्ये आपली पकड मजबूत केली आहे. ब्रोकरेज दरातील वाढीमुळे प्रति ऑर्डर महसूल १५.७ रुपयांवर पोहोचला असून, कंपनीचा ऑपरेटिंग मार्जिन ४०-४५% राहण्याचा अंदाज आहे.
४. कॅनरा एचएसबीसी लाईफ, टार्गेट प्राईस : १८० रुपयेकॅनरा बँक आणि एचएसबीसीच्या भक्कम पाठिंब्यामुळे या विमा कंपनीची वाढ वेगाने होत आहे. बँकेच्या कोट्यवधी ग्राहकांपर्यंत विमा पोहोचवण्याची मोठी संधी कंपनीकडे आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म आणि एनआरआय ग्राहकांमुळे कंपनीची कार्यक्षमता वाढत असून, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
५. एपीएल अपोलो ट्युब्स, टार्गेट प्राईस : २,२६० रुपयेस्ट्रक्चरल स्टील ट्युब्स क्षेत्रात ५५% हिस्सा असलेल्या या कंपनीने आता सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी लागणाऱ्या 'सोलर माउंटिंग स्ट्रक्चर्स'वर लक्ष केंद्रित केले आहे. २०३० पर्यंत आपली क्षमता ४.५ दशलक्ष टनांवरून १० दशलक्ष टनांपर्यंत नेण्याची कंपनीची योजना आहे, ज्यामुळे कंपनीच्या नफ्यात मोठी वाढ होऊ शकते.वाचा - पैसा येणार कसा, कुठून अन् किती; तुम्ही तुमचं 'बजेट' कधी तयार केलंय का?
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Motilal Oswal highlights five stocks, including Tata Steel and Ultratech Cement, poised for growth due to rising domestic demand and expansion. Angel One and Canara HSBC Life also show promise, alongside APL Apollo Tubes' solar focus, offering potential investor gains.
Web Summary : मोतीलाल ओसवाल ने टाटा स्टील और अल्ट्राटेक सीमेंट सहित पांच शेयरों पर प्रकाश डाला, जो घरेलू मांग और विस्तार बढ़ने के कारण विकास के लिए तैयार हैं। एंजल वन और केनरा एचएसबीसी लाइफ भी आशाजनक दिखते हैं, साथ ही एपीएल अपोलो ट्यूब्स का सौर ऊर्जा पर ध्यान निवेशकों को संभावित लाभ प्रदान करता है।