Join us

भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 11:10 IST

5 Stocks Expect Strong Returns : फार्मा, संरक्षण, एफएमसीजी, वित्तीय सेवा आणि केबल उद्योगातील या स्टॉक्समध्ये आगामी काळात मजबूत वाढ होण्याची क्षमता आहे.

Stock Market Updates : गेल्या वर्षभरापासून शेअर बाजार प्रचंड अस्थिर आहे. अशाही परिस्थितीत काही स्टॉक्स चांगली कमाई करुन देत आहेत. तुम्ही देखील चांगला परतावा देणाऱ्या स्टॉक्सच्या शोधात असाल तर मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या रिसर्च डेस्कने काही निवडक शेअर्सवर 'बाय' रेटिंग कायम ठेवले आहे. फार्मा, संरक्षण, एफएमसीजी, वित्तीय सेवा आणि केबल उद्योगातील या स्टॉक्समध्ये आगामी काळात मजबूत वाढ होण्याची क्षमता आहे.

१. रुबिकॉन रिसर्च – लक्ष्य किंमत: ७४० रुपयेरुबिकॉन रिसर्च ही जलद वाढणारी फार्मा कंपनी असून, ती नियमन केलेल्या बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करते. गेल्या ३ आणि १० वर्षांत कंपनीचा महसूल अनुक्रमे ६०% आणि ४२% CAGR दराने वाढला आहे, तर RoE २९% इतका दमदार आहे. ७० उत्पादनांच्या पोर्टफोलिओमुळे आणि नेझल स्प्रेसारख्या नवीन विभागांमुळे कंपनीकडे मोठी क्षमता आहे. त्यांनी FY25 मध्ये २.५ अब्ज रुपये EBITDA कमावला आहे, जो FY22 मधील तोट्याच्या तुलनेत मोठी झेप आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, FY25 ते FY28 दरम्यान महसूल, EBITDA आणि PAT मध्ये अनुक्रमे २९%, ३२% आणि ४३% CAGR अपेक्षित आहे.

२. भारत इलेक्ट्रॉनिक्स – लक्ष्य किंमत: ५०० रुपयेभारत इलेक्ट्रॉनिक्स ही संरक्षण क्षेत्रातील आघाडीची कंपनी असून, तिचे ऑर्डर बुक १ ट्रिलियनच्या पलीकडे गेले आहे. DRDO ने विकसित केलेल्या ३०० अब्ज रुपयांच्या QRSAM 'अनंत शस्त्र' प्रकल्पात बीईएल प्रमुख इंटिग्रेटर आहे. रडार, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टिम्स आणि ड्रोन-डिफेन्स सोल्यूशन्समध्ये कंपनी मजबूत स्थितीत आहे. FY25 ते FY28 दरम्यान विक्री, EBITDA आणि PAT मध्ये सुमारे १७% CAGR अपेक्षित आहे. भारताच्या संरक्षण आधुनिकीकरणामध्ये बीईएल एक महत्त्वपूर्ण गुंतवणूक म्हणून पुढे येत आहे.

३. रॅडिको खैतान – लक्ष्य किंमत: ३६०० रुपयेरॅडिको खैतान ही कंपनी प्रीमियम आणि लक्झरी स्पिरिट्स विभागात आक्रमक विस्तार करत असल्याने दीर्घकालीन वाढीसाठी सज्ज आहे. '8PM', 'Magic Moments' आणि 'Rampur Single Malt' यांसारख्या मजबूत ब्रँडमुळे कंपनीला फायदा होत आहे. Q2FY26 मध्ये महसूल ३४% (YoY) आणि व्हॉल्यूम ३८% ने वाढला. महत्त्वाचे म्हणजे, आंधप्रदेशात कंपनीचा बाजार वाटा १०% वरून ३०% पर्यंत वाढला आहे. व्यवस्थापनाने मार्जिनमध्ये वार्षिक १२५–१५०bp विस्तार करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, कंपनी FY27 पर्यंत कर्जमुक्त होण्याच्या मार्गावर आहे.

४. श्रीराम फायनान्स (Shriram Finance) – लक्ष्य किंमत: ८६० रुपयेश्रीराम फायनान्स वाहनांच्या वित्तपुरवठा आणि बिगर-वाहन उत्पादनांमध्ये क्रॉस-सेल संधींचा प्रभावीपणे वापर करत आहे. Q2FY26 मध्ये कंपनीने PAT मध्ये ११% (YoY) वाढ नोंदवली, जी NIM विस्तार आणि कमी क्रेडिट खर्चाचे संकेत देते. कंपनीची AUM १६% (YoY) ने वाढली आहे. कंपनी लहान शाखांद्वारे गोल्ड लोन वाढवण्यावर आणि वाहन वित्तपुरवठ्यासाठी OEM भागीदारी मजबूत करण्यावर भर देत आहे. FY26/FY27 मध्ये NIM (Net Interest Margin) ८.२%/८.६% अपेक्षित आहे.

५. पॉलीकॅब – लक्ष्य किंमत: ९११० रुपयेपॉलीकॅबने देशांतर्गत संघटित केबल आणि वायर्स मार्केटमध्ये २६-२७% वाटा मिळवून आपले निर्विवाद नेतृत्व सिद्ध केले आहे. कंपनीचे विविधीकृत पोर्टफोलिओ आणि मजबूत वितरण नेटवर्क शाश्वत वाढीस समर्थन देत आहे. कंपनीचा FMEG सेगमेंट FY25 मध्ये २९% नी वाढला आहे आणि 4QFY25 मध्ये 'ब्रेकइव्हन' झाला आहे. 'प्रोजेक्ट स्प्रिंग' अंतर्गत पॉलीकॅबने C&W आणि FMEG या दोन्ही विभागांमध्ये उद्योगाच्या दरापेक्षा १.५–२.० पट वेगाने वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ज्यामुळे दीर्घकाळात कंपनीची वाढ मजबूत राहील.

वाचा - १२-१५ महिने एसआयपीमध्ये गुंतवणूक केली, तरीही परतावा शून्य; 'या' ५ चुका टाळा, मोठा परतावा मिळवा

डिस्क्लेमर : हा लेख मोतीलाल ओसवाल फायनॅन्शियल सर्व्हिसेसने दिलेल्या रिसर्च रिपोर्टवर आधारित आहे. शेअर बाजारातीलगुंतवणूक जोखीमेच्या अधीन आहे. कोणताही गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी कृपया आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Brokerage bullish on these 5 stocks: Polycab, BEL, and more.

Web Summary : Motilal Oswal is bullish on Rubicon, BEL, Radico, Shriram Finance, and Polycab. These stocks from pharma, defense, and finance sectors are expected to give good returns in the future due to strong growth potential.
टॅग्स :स्टॉक मार्केटशेअर बाजारगुंतवणूक