Monolithisch India IPO Listing: मोनोलिथिक इंडियाच्या शेअर्सची बाजारात बंपर लिस्टिंग झाली आहे. मोनोलिथिक इंडियाचा शेअर गुरुवारी ६१.९ टक्क्यांनी वधारून २३१.५५ रुपयांवर लिस्ट झाला. लिस्टिंगनंतर लगेचच कंपनीचे शेअर्स ५ टक्क्यांच्या अपर सर्किटसह २४३.१० रुपयांवर पोहोचले. आयपीओच्या लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी कंपनीचे शेअर्स ७० टक्के म्हणजेच १००.१० रुपयांनी वधारले. आयपीओमध्ये मोनोलिथिक इंडियाच्या शेअरची किंमत १४३ रुपये होती. कंपनीचा एकूण इश्यू साइज ८२.०२ कोटी रुपयांपर्यंत होता.
१८२.८९ पट झालेला सबस्क्राईब
मोनोलिथिक इंडियाचा आयपीओ एकूण १८२.८९ पट सब्सक्राइब झाला. रिटेल इन्व्हेस्टर्स कॅटेगरीमध्ये ९४.७१ पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं. तर नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (एनआयआय) कॅटेगरीमध्ये आयपीओ ४५९.९९ पट सब्सक्राइब झाला. कंपनीच्या आयपीओमध्ये क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा (क्यूआयबी) कोटा १२९.२० पट सब्सक्राइब करण्यात झाला होता. मोनोलिथिक इंडियाचा आयपीओ १२ जून २०२५ रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आणि १६ जूनपर्यंत त्यासाठी बोली लावता येणार होती. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना केवळ १ लॉटसाठी बोली लावता आली. आयपीओच्या एका लॉटमध्ये १००० शेअर्स होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना १ लॉटसाठी १,४३,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागली.
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
काय करते कंपनी?
ऑगस्ट २०१८ मध्ये मोनोलिथिक इंडियाची सुरुवात करण्यात आली होती. ही कंपनी हीट इन्सुलेशन रिफ्रेक्टरी स्पेशलाईज्ड 'रॅमिंग मास' तयार करते. हे उत्पादन लोह आणि पोलाद उद्योग इंडक्शन भट्ट्यांमध्ये वापरलं जातं. कंपनीच्या उत्पादनांमध्ये एसजीबी -७७७, एसएलएम -९९९, बीजी -७७, क्वार्टाइट ग्रेन एसएलएम - ९८० आणि एसएलएम ९८० यांचा समावेश आहे. कंपनीचे प्रमुख ग्राहक लोह आणि पोलाद उत्पादक आहेत. कंपनीचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथे आहे. आयपीओपूर्वी प्रवर्तकांचा कंपनीत १०० टक्के हिस्सा होता, तो आता ७३.६१ टक्क्यांवर आला आहे. प्रभात टेकरीवाल, शर्मिला टेकरीवाल, हर्ष टेकरीवाल, क्रिश टेकरीवाल आणि कारगिल ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड हे कंपनीचे प्रवर्तक आहेत.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेल आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)