Join us

१९ दिवसांत पैसे दुप्पट, 'या' पेनी स्टॉकनं केलं मालामाल; खरेदीसाठी उड्या, तुमच्याकडे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 16:58 IST

Penny Stock: शेअर बाजारासाठी गेले काही महिने अत्यंत अस्थिर राहिलेत. या दरम्यान बाजारात विक्रमी घसरण पाहायला मिळाली. मात्र, सध्या तो रिकव्हरी मोडमध्ये आहे. असं असूनही अनेक शेअर्स निम्म्यापेक्षा कमी किमतीत ट्रेड करत आहेत.

Penny Stock: शेअर बाजारासाठी गेले काही महिने अत्यंत अस्थिर राहिलेत. या दरम्यान बाजारात विक्रमी घसरण पाहायला मिळाली. मात्र, सध्या तो रिकव्हरी मोडमध्ये आहे. असं असूनही अनेक शेअर्स निम्म्यापेक्षा कमी किमतीत ट्रेड करत आहेत. या सगळ्यादरम्यान काही पेनी शेअर्समध्ये बंपर तेजी पाहायला मिळाली. त्यापैकी एक म्हणजे कोव्हान्स सॉफ्टसोल लिमिटेडचे (Covance Softsol Ltd) शेअर्स. शुक्रवारी कंपनीचा शेअर २ टक्क्यांनी वधारला आणि ६.६७ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. ही त्याची ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत आहे.

एका महिन्यात १७० टक्क्यांची वाढ

कोव्हन्स सॉफ्टसोल लिमिटेडचा शेअर केवळ १९ दिवसांत १७० टक्क्यांनी वधारला. या कालावधीत त्याची किंमत २.४८ रुपये (२८ फेब्रुवारी २०२५ ची बंद किंमत) वरून सध्याच्या किंमतीवर पोहोचली. पाच दिवसांत हा शेअर १५ टक्क्यांनी वधारला आहे. या वर्षी आतापर्यंत हा शेअर २१० टक्क्यांनी वधारलाय. या कालावधीत हा शेअर २.१६ रुपयांवरून सध्याच्या किमतीवर पोहोचला आहे. पेनी स्टॉक्स असे शेअर्स आहेत ज्यांची किंमत खूप कमी असते, बहुतेकदा २० रुपये प्रति शेअरपेक्षा कमी आणि अशा कंपन्यांचे मार्केट कॅपदेखील कमी असतं.

कंपनी व्यवसाय

कोव्हन्स सॉफ्टसोल लिमिटेड ही ११ ऑगस्ट २०२३ रोजी स्थापन झालेली एक भारतीय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. हे भारतातील कम्प्युटर प्रोगरामिंग, कन्सल्टन्ट आणि संबंधित व्यवसायांमध्ये सक्रिय आहे. कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत ६.६७ रुपये आणि ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत २.०६ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप ९.८५ कोटी रुपये आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक