Join us

सरकार बनताच अॅक्शन मोडमध्ये येणार मोदी! बँकेसह या कंपनीतील हिस्सा विकण्याचा प्लान; शेअर्स बनले रॉकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 16:01 IST

नवनिर्वाचित सरकारच्या पहिल्या १०० दिवसांच्या अजेंड्यात काय असेल, याबाबत कयास सुरू झाले आहेत. एक्झिट पोलनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार पुन्हा स्थापन होण्याची शक्यता आहे.

PSU Stake Sale: नवनिर्वाचित सरकारच्या पहिल्या १०० दिवसांच्या अजेंड्यात काय असेल, याबाबत कयास सुरू झाले आहेत. एक्झिट पोलनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार पुन्हा स्थापन होण्याची शक्यता आहे. नवं सरकार आपल्या कार्यकाळाच्या पहिल्या १०० दिवसांत निर्गुंतवणुकीवर भर देऊ शकते, असं सांगण्यात येत आहे. या यादीत आयडीबीआय बँक आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या टॉपवर आहेत. 

काय आहे माहिती? 

सीएनबीसी आवाजनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, नवं सरकार आपल्या कार्यकाळाच्या पहिल्या १०० दिवसांत निर्गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करू शकते. आयडीबीआय बँक आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एससीआय) यावेळी पहिल्या क्रमांकावर आहेत. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये सरकारचा ६३.७५ टक्के हिस्सा आहे. तो विकण्याचा सरकारचा विचार असू शकतो. सुरुवातीला एससीआयसाठी निविदा मागविल्या जाण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलं. यापूर्वी एससीआयच्या लँड अॅसेट युनिटला डीलिस्ट करण्यात आलं होतं आणि एक्स्चेंजवर स्वतंत्रपणे लिस्ट करण्यात आलं. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळापासून मंदावलेल्या आयडीबीआय बँकेच्या निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. सूत्रांनी सांगितलं की, आरबीआय अशा लोकांच्या नावांचा विचार करीत आहे ज्यांनी बँक खरेदीत स्वारस्य दाखवलं होतं. आरबीआयनं योग्य कँडिडेटची तपासणी केल्यानंतर गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग (दीपम) यावर अंतिम मंजुरी देईल. 'फिट अँड प्रॉपर' प्रक्रियेअंतर्गत याचा विचार केला जात आहे. सध्या आयडीबीआय बँकेत सरकारचा ४९.२४ टक्के आणि एलआयसीचा ४५.४८ टक्के हिस्सा आहे.

टॅग्स :नरेंद्र मोदीसरकार