Join us

७ दिवसांत १२०% वधारला 'हा' नवा शेअर, याच महिन्यात आलेला IPO; एक्सपर्ट म्हणाले...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 15:09 IST

Mobikwik Share Price: कंपनीची लिस्टिंग ५८ टक्के प्रीमियमवर झाली होती. १८ डिसेंबर २०२४ च्या शानदार लिस्टिंगनंतरही कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्यानं तेजी दिसून आली आहे.

Mobikwik Share Price : शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री घेतल्यानंतर मोबिक्विकच्या (One Mobikwik Systems Limited) शेअर्समध्ये सातत्यानं तेजी पाहायला मिळत आहे. कंपनीची लिस्टिंग ५८ टक्के प्रीमियमवर झाली होती. १८ डिसेंबर २०२४ च्या शानदार लिस्टिंगनंतरही कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्यानं तेजी दिसून आली आहे. शुक्रवारी एनएसईवर कंपनीच्या शेअरचा भाव बाजार बंद होताना ६२२.९५ रुपये होता. आयपीओमध्ये ज्या गुंतवणूकदाराला कंपनीचे शेअर्स अलॉट झाले, त्यांना केवळ ७ दिवसांत १२० टक्के परतावा मिळाला आहे. अशा तऱ्हेनं आता या कंपनीचे शेअर्स खरेदी करणं फायद्याचं ठरेल की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जाणून घेऊया काय म्हणतात एक्सपर्ट.काय म्हणाले एक्सपर्ट?

मिंटनं दिलेल्या वृत्तानुसार ब्रोकरेज हाऊस स्टॉकबॉक्सशी संबंधित अभिषेक पंड्या म्हणतात, "मोबिक्विक हा तिसऱ्या क्रमाकाचं सर्वात मोठं रजिस्टर्ड वॉलेट प्लॅटफॉर्म आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचे १३५.४१ दशलक्ष युजर्स होते. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीला नफाही झाला होता. आर्थिक वर्षात एबिटडा मार्जिन निगेटिव्ह २१.२४ टक्के होते. तर आर्थिक वर्ष २०२४ मध्ये तो ४.१८ टक्के राहिला आहे. यावरून कंपनी एबिटडा आणि पीएटी स्तरावर नफा कमावत असल्याचे दिसून येते. अतिशय आव्हानात्मक क्षेत्र असूनही मोबिक्विकने स्वत:चे चांगले स्थान निर्माण केले आहे.”

"मोबिक्विकचे शेअर्स चार्ट पॅटर्नवर सकारात्मक दिसत आहेत. नुकत्याच लिस्टेड झालेल्या कंपनीनं ५९० रुपयांचा मजबूत बेस तयार केला आहे. मोबिक्विकचा शेअर लवकरच ७०० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो,” अशी प्रतिक्रिया Lakshmishree Investment and Services चे रिसर्च हेड अंशुल जैन यांनी दिली

११ डिसेंबरला उघडलेला आयपीओ

कंपनीचा आयपीओ ११ डिसेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत खुला होता. कंपनीनं आयपीओसाठी २६५ ते २७९ रुपये प्रति शेअर किंमत निश्चित केली होती. बीएसईवर कंपनीची पहिली लिस्टिंग ४४२.२५ रुपये प्रति शेअर आणि एनएसईवर ४४० रुपये प्रति शेअर होती.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक