Milky Mist IPO : सध्या आयपीओ मार्केटमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. अनेक कंपन्या शेअर बाजारात पदार्पण करत आहेत, त्यापैकी काही गुंतवणूकदारांना मालामाल करत आहेत, तर काही कंपन्यांनी निराशा केली आहे. आता या यादीत आणखी एका मोठ्या कंपनीचे नाव जोडले जाण्याची शक्यता आहे. दूध, दही, लोणी आणि इतर दुग्धजन्य पदार्थ विकणारी आघाडीची कंपनी मिल्की मिस्ट डेअरी फूड लिमिटेड लवकरच आपला IPO आणणार आहे. त्यासाठी त्यांनी बाजार नियामक सेबीकडे मसुदा कागदपत्रे सादर केली आहेत.
२०३५ कोटी उभारण्याची तयारीपीटीआयच्या वृत्तानुसार, मिल्की मिस्ट डेअरी फूड लिमिटेडने सोमवारी (२१ जुलै २०२५) सेबीकडे त्यांच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंगसाठी मसुदा कागदपत्रे सादर केली आहेत. या इश्यूद्वारे, कंपनी बाजारातून २,०३५ कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. डीआरएचपी (Draft Red Herring Prospectus) मध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनी या आयपीओमध्ये नवीन शेअर्स जारी करेल, तर काही शेअर्स प्रमोटर्सकडून ऑफ ऑफर सेलद्वारे विक्रीसाठी ठेवले जातील.
नवीन शेअर्स आणि OFS चे आकडेमिल्की मिस्ट डेअरी फूडने सेबीकडे दाखल केलेल्या मसुद्यात म्हटले आहे की, ती तिच्या आयपीओमधील एकूण इश्यू आकारापैकी १,७८५ कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्स विकेल. तर, कंपनीच्या प्रवर्तकांकडून २५० कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे विकले जातील.
हे पैसे कुठे वापरले जातील?आयपीओद्वारे बाजारातून उभारलेले पैसे मिल्की मिस्ट डेअरी फूड लिमिटेड कर्ज फेडण्यासाठी आणि इतर महत्त्वाच्या कारणांसाठी वापरणार आहे. अहवालानुसार, कंपनी एकूण रकमेपैकी ७५० कोटी रुपये कर्ज फेडण्यासाठी वापरेल. याशिवाय, पेरुंडुराई येथील उत्पादन सुविधेचा विस्तार आणि आधुनिकीकरण करण्यासाठी ४१४ कोटी रुपये वापरले जातील. यामध्ये 'व्हे प्रोटीन कॉन्सन्ट्रेट' दही आणि क्रीम चीज प्लांट उभारणे समाविष्ट आहे.
वाचा - तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
कंपनी काय बनवते?कंपनीच्या नावावरूनच स्पष्ट होते की, ही दुग्ध क्षेत्राशी संबंधित एक मोठी कंपनी आहे. तिच्या उत्पादनांना बाजारात मोठी मागणी आहे. 'मिल्की मिस्ट' या पॅकेज्ड फूड ब्रँडच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये चीज, पनीर, बटर, दही, तूप, आईस्क्रीम, चॉकलेट आणि इतर गोठलेले पदार्थ यांचा समावेश आहे. कंपनीने वर्षाच्या सुरुवातीलाच आयपीओचे संकेत दिले होते, जेव्हा तिने जेएम फायनान्शियल, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस आणि अॅक्सिस कॅपिटल यांना मर्चंट बँकर म्हणून नियुक्त केले होते. मिल्की मिस्टचा हा IPO आता गुंतवणूकदारांसाठी एक नवीन पर्याय उपलब्ध करून देणार आहे.