Mercury EV-Tech Share: स्मॉल-कॅप सेगमेंटमधील मल्टीबॅगर शेअर मरकरी ईव्ही-टेक (Mercury EV-Tech) बुधवारी(२५ फेब्रुवारी) जोरदार तेजीमुळे चर्चेत राहिला. बाजारातील मजबुतीच्या पार्श्वभूमीवर या इलेक्ट्रिक वाहन (EV) कंपनीच्या शेअरने इंट्राडे व्यवहारात सुमारे ८.५ टक्क्यांची झेप घेत ₹३५.५५ पर्यंत मजल मारली.
मात्र, ही तेजी असूनही हा शेअर अजूनही आपल्या ५२ आठवड्यांच्या उच्चांक ₹७६.९३ (एप्रिल २०२५) च्या तुलनेत सुमारे ५४ टक्के घसरणीत आहे. गेल्या महिन्यात हा शेअर ₹२९.९५ या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली होती.
दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला
दीर्घकालीन दृष्टीकोनातून पाहिल्यास, मरकरी ईव्ही-टेकने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. सध्या ₹५० पेक्षा कमी किमतीत ट्रेड होणाऱ्या या शेअरने गेल्या पाच वर्षांत सुमारे ४,६५० टक्क्यांचा जबरदस्त परतावा दिला आहे. याचा अर्थ, सुरुवातीच्या टप्प्यात ज्यांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केली, त्यांना मल्टीबॅगर नफा मिळाला. मात्र, अलिकडच्या काळात शेअरची कामगिरी कमकुवत राहिली आहे.
अल्पकालीन कामगिरी कमकुवत
शेअरच्या अलीकडील परफॉर्मन्सकडे पाहिल्यास गेल्या एका वर्षात सुमारे ४९%, सहा महिन्यांत ४५%, तीन महिन्यांत १४%, तर मागील एका महिन्यात ६% पेक्षा अधिक घसरण नोंदवली आहे. यामुळे अल्पकालीन गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
तिमाही निकाल: स्थिर वाढ, पण नफा मर्यादित
कंपनीच्या आर्थिक कामगिरीकडे पाहिल्यास, आर्थिक वर्ष 2025-26 च्या तिसऱ्या तिमाहीत (Q3)...
एकूण विक्री (नेट सेल्स) : ₹२५.२९ कोटी
निव्वळ नफा (नेट प्रॉफिट) : ₹०.८९ कोटी
तर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यांत...
एकूण विक्री : ₹८१.८६ कोटी
निव्वळ नफा : ₹४.२२ कोटी
हे आकडे कंपनीचा व्यवसाय स्थिर गतीने वाढत असल्याचे दर्शवतात. मात्र, नफ्याचा मार्जिन अद्याप मर्यादित असल्याचेही स्पष्ट होते.
शेअरहोल्डिंग पॅटर्नमध्ये महत्त्वाचा बदल
मरकरी ईव्ही-टेकच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नमध्येही महत्त्वाचा बदल दिसून आला आहे. डिसेंबर तिमाहीत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) कंपनीतील आपली हिस्सेदारी वाढवली आहे.
FIIs कडून खरेदी : १४,७१,६३८ शेअर्स
सप्टेंबर २०२५ मध्ये हिस्सेदारी : १.९०%
डिसेंबर तिमाहीत हिस्सेदारी : २.६८%
सामान्यतः FII ची वाढती हिस्सेदारी हा बाजारासाठी सकारात्मक संकेत मानला जातो, कारण तो मोठ्या गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्वास दर्शवतो.
कंपनीचा व्यवसाय काय?
१९८६ साली स्थापन झालेली मरकरी ईव्ही-टेक इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनी इलेक्ट्रिक स्कूटर, कार आणि बसचे उत्पादन व ट्रेडिंग, इलेक्ट्रिक व्हिंटेज वाहन, गोल्फ कार्टसारखी विशेष वाहने, हॉस्पिटॅलिटी आणि औद्योगिक क्षेत्रासाठी कस्टमाइज्ड EV सोल्यूशन्स...अशा विविध उत्पादनांवर लक्ष केंद्रित करते.
(विशेष सूचना- कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ञांचा सल्ला घ्या.)
Web Summary : Mercury EV-Tech's share price jumped, offering huge returns over five years. Despite this, recent performance has been weak, with significant drops in the last year. The company shows stable sales, but limited profits.
Web Summary : मर्करी ईवी-टेक के शेयर की कीमत में उछाल, पांच वर्षों में भारी रिटर्न मिला। इसके बावजूद, हालिया प्रदर्शन कमजोर रहा है, पिछले एक साल में काफी गिरावट आई है। कंपनी की बिक्री स्थिर है, लेकिन मुनाफा सीमित है।