Join us
Daily Top 2Weekly Top 5

युद्धामुळे कमोडिटी बाजारात भूकंप! सोने आणि कच्चे तेल महागणार; भारतीयांवर काय परिणाम होईल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 10:54 IST

Gold and Crude Oil : अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे सोमवारी भारतीय कमोडिटी बाजारात जोरदार तेजी येऊ शकते. सुरक्षित-निवासी मागणी वाढल्यामुळे एमसीएक्स एक्सचेंजवर सोन्याचे भाव ५% पर्यंत वाढू शकतात.

Gold and Crude Oil : अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला असून त्याचे गंभीर पडसाद भारतीय कमोडिटी बाजारात उमटणार आहेत. उद्या, सोमवारी बाजार उघडताच सोने आणि कच्च्या तेलाच्या किमतीत तेजीसह सुरुवात पाहायला मिळू शकते. इराणच्या अणुप्रकल्पांवरील हल्ले आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने डागलेली क्षेपणास्त्रे यामुळे जागतिक स्तरावर अनिश्चितता वाढली असून गुंतवणूकदारांनी सुरक्षित मालमत्तांकडे मोर्चा वळवला आहे.

सोन्याच्या झळाळीत मोठी वाढ अपेक्षितआंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे देशांतर्गत मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर ५ टक्क्यांनी वधारण्याची शक्यता आहे. अणुकराराबाबतचे राजकीय प्रयत्न अपयशी ठरल्याने अखेर युद्धाला सुरुवात झाल्याने गुंतवणूकदार सोन्याला सर्वाधिक सुरक्षित मानत आहेत. डॉलर इंडेक्समधील चढ-उतारामुळे दिवसभर सोन्याच्या भावात मोठी अस्थिरता राहू शकते, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

कच्चे तेल ८ टक्क्यांनी भडकणार?युद्धाच्या आगीत कच्चे तेल होरपळण्याची दाट शक्यता आहे. सर्वात मोठी भीती 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ' या सागरी मार्गाबाबत आहे. हा मार्ग जागतिक तेल व्यापाराचा कणा मानला जातो. जर हा मार्ग विस्कळीत झाला, तर जागतिक तेल पुरवठा ठप्प होईल. पुरवठा खंडित होण्याच्या भीतीने कच्च्या तेलाचे दर सुरुवातीच्या सत्रात ८ टक्क्यांपर्यंत वाढू शकतात.

वाचा - होळीपूर्वी महागाईचा 'भडका'! गॅस सिलेंडर ३१ रुपयांनी महागला; 'या' ग्राहकांना मात्र दिलासा

गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा 'सावधान'चा इशाराबाजार तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या परिस्थितीत ट्रेडर्सनी अत्यंत सतर्क राहण्याची गरज आहे. भू-राजकीय घडामोडींशी संबंधित प्रत्येक नवीन बातमी किमतीत अचानक मोठे बदल घडवून आणू शकते. उच्च अस्थिरतेच्या काळात मोठी जोखीम घेण्याऐवजी 'स्टॉप लॉस' आणि जोखीम व्यवस्थापन रणनीतीला प्राधान्य देणे आवश्यक आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : War Shakes Commodity Market: Gold and Crude Oil Prices to Surge!

Web Summary : Geopolitical tensions are set to roil commodity markets. Gold and crude oil prices are expected to jump due to the escalating conflict, impacting Indian consumers. Experts advise caution and risk management during this volatile period. The 'Strait of Hormuz' is key.
टॅग्स :सोनंचांदीस्टॉक मार्केटखनिज तेल