Join us

मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 17:03 IST

maruti suzuki : देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी मारुती सुझुकीचा करोत्तर नफा घटला आहे. गेल्या एका वर्षात कंपनीचा करोत्तर नफा १ टक्क्यांनी कमी झाला आहे.

maruti suzuki : प्रत्येक भारतीयच्या हृदयात मारुती सुझुकी या नावाला विशेष महत्त्व आहे. कारण, मध्यमवर्गीयांचं चारचाकी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण करणारी कंपनी, लक्झरी सेगमेंटमध्येही वाहन निर्मिती करते. त्यामुळे देशात सर्वाधिक वाहन विक्री करण्यात मारुती सुझुकी कंपनी पहिल्या क्रमांकावर आहे. पण, देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी मारुतीला मोठा धक्का बसला आहे. कार विक्रीत अव्वल स्थानावर असूनही, कंपनीचा नफा कमी झाला आहे. गेल्या एका वर्षात कंपनीचा करोत्तर नफा १ टक्क्यांनी कमी झाला आहे, जो गेल्या वर्षी मार्चमध्ये ३,९५२ कोटी रुपयांचा होता. या वर्षी हा नफा ३,९११ कोटी रुपयांपर्यंत घसरला. दरम्यान, मागील तिमाहीच्या तुलनेत कंपनीचा पीएटी वाढला आहे.

मारुती कंपनीचे उत्पन्न वाढलंएकीकडे, कंपनीचा नफा एका वर्षात १ टक्क्यांनी कमी झाला आहे. पण, दुसरीकडे कंपनीच्या महसुलात वाढ झाली आहे. मारुतीने शेअर बाजारात दाखल केलेल्या माहितीत कंपनीने म्हटले आहे की Q4FY25 चा एकूण महसूल ४०,९२० कोटी रुपये आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या त्याच तिमाहीतील ३८,७४१ कोटी रुपयांपेक्षा ६.४% जास्त आहे. यामध्ये, उत्पादन विक्रीतून मिळणारा महसूल ३८,८४२ कोटी रुपये होता तर कंपनीने इतर ऑपरेटिंग महसूल म्हणून २,०७८ कोटी रुपये कमावले.

शुक्रवारी मारुती सुझुकीनेशेअर बाजारात फायलिंग केलं. कंपनीने आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे, ज्यामध्ये कंपनीचा करमुक्त नफा तसेच स्वतंत्र नफा प्रत्येकवर्षी घटला आहे. मारुतीचा स्वतंत्र नफा वार्षिक आधारावर ४.३% घसरून ३,७११ कोटी रुपयांवर आला, जो २०२४ मध्ये याच तिमाहीत ३,८७८ कोटी रुपयांचा होता.

नफा घटल्याचा शेअर्सवर परिणाममारुती सुझुकी इंडियाच्या नफ्यात घट झाल्याचा परिणाम त्यांच्या शेअर्सवर दिसून आला. मारुतीचे शेअर्स २ टक्क्यांहून अधिक घसरले. कंपनीचे शेअर्स आज ११८६६.३५ रुपयांना उघडले. ज्याने ट्रेडिंग दरम्यान १२०४७ चा उच्चांक गाठला. पण बाजार बंद होईपर्यंत शेअर्स सुमारे २५० रुपयांनी घसरले.

वाचा - पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

मारुती सुझुकीचा नफा का घटला?कंपनीचा नफा घटण्यामागे खर्च वाढण्याचे कारण कंपनीने सांगितले आहे. कंपनीने म्हटले आहे की चौथ्या तिमाहीत त्यांचा एकूण खर्च ३७,५८५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षीच्या चौथ्या तिमाहीत ३४,६२४ कोटी रुपये इतका होता. याचा अर्थ खर्चात ८.५ टक्के वाढ झाली आहे. 

टॅग्स :मारुती सुझुकीमारुतीशेअर बाजारशेअर बाजार