Share Market Update: प्रॉफिट बुकींगमुळे, भारतीय शेअर बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक मंगळवारी 7 नोव्हेंबर रोजी किरकोळ घसरणीसह बंद झाले. मात्र, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्ये चांगली खरेदी दिसून आली, त्यामुळे शेअर बाजारातीलगुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज सुमारे 92 हजार कोटी रुपयांची वाढ झाली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.53 टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.38 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. तर सेक्टरल इंडेक्समध्ये रिअॅल्टी आणि ऑटो शेअर्स वगळता इतर जवळपास सर्व निर्देशांक वाढीसह बंद झाले. फार्मा आणि ऑईल अँड गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली.कामकाजाच्या अखेरच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स 16.29 अंकांनी किंवा 0.025 टक्क्यांनी घसरून 64,942.40 अंकांवर बंद झाला. तर एनएसईचा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 5.05 अंकांनी किंवा 0.026 टक्क्यांनी घसरला आणि 19,406.70 च्या पातळीवर बंद झाला.संपत्ती वाढलीबीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं एकूण बाजार भांडवल आज 7 नोव्हेंबर रोजी 319.09 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे सोमवार, 6 नोव्हेंबर रोजी 318.17 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, बीएसईवरील लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप आज सुमारे 92 हजार कोटी रुपयांनी वाढलं आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 92 हजार कोटी रुपयांची वाढ झाली.हे शेअर्स वधारलेसेन्सेक्समधील 30 पैकी 16 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. त्यातही सन फार्माच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 1.95 टक्क्यांची वाढ झाली. तर एनटीपीसी, इंडसइंड बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अॅक्सिस बँकेचे शेअर्स सुमारे 1.06 टक्के ते 1.51 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.यात घसरणतर उर्वरित 14 सेन्सेक्स शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यामध्येही बजाज फायनान्सचे शेअर्स सर्वाधिक 0.99 टक्क्यांनी घसरले. याशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीज, जेएसडब्ल्यू स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा यांचे शेअर्स 0.47 टक्के ते 0.64 टक्क्यांनी घसरून बंद झाले.
नफा वसुलीमुळे किरकोळ घसरणीसह बंद झाला बाजार, तरी गुंतवणूकदारांनी कमावले ₹९२,००० कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 16:52 IST