Join us

सलग दुसऱ्या दिवशी बाजार रेड झोनमध्ये बंद! टाटाच्या या कंपनीचा शेअर सर्वाधिक घसरला, टॉप गेनर कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 16:39 IST

Share Market : आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. आज, सेन्सेक्स २१३.१२ अंकांच्या घसरणीनंतर ७८,०५८ च्या पातळीवर बंद झाला.

Share Market : गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होत आहे. एखाद्या दिवशी बाजार वाढीसह बंद होत असेल तर दुसऱ्याच दिवशी घसरण दिसून येते. जागतिक बाजारातील मंदीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजारही घसरणीसह बंद झाला. आजच्या व्यवहारात फार्मा, आयटी, प्रायव्हेट बँक वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरले. तर ऑटो, एफएमसीजी, रियल्टी, कंझ्युमर ड्युरेबल्स १-२ टक्क्यांनी घसरले. मेटल, पीएसयू बँक, एनर्जी, मीडिया, ऑइल अँड गॅसच्या स्टॉक्समध्येही ०.४-०.८ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली.

सर्वाधिक घसरण कोणत्या क्षेत्रात?निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक १.२ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.३ टक्क्यांनी घसरला. निफ्टीमध्ये ट्रेंट, भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारती एअरटेल, टायटन कंपनी, एनटीपीसी या समभागांमध्ये मोठी घसरण झाली, तर सिप्ला, अदानी पोर्ट्स, इन्फोसिस, डॉ रेड्डीज लॅब्स, टाटा कंझ्युमर या समभागांमध्ये वाढ झाली.

कोणत्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ?आजच्या व्यवहारात सिप्लाचे शेअर्स २.४२% च्या सर्वाधिक वाढीसह १,४७२ च्या पातळीवर बंद झाले, तर अदाणी पोर्ट सेझ १.७३% च्या वाढीसह १,१६४ च्या पातळीवर बंद झाले. इन्फोसिसचे शेअर्समध्ये ०.९९% वाढ झाली. तर दुसरीकडे टाटा कंझ्युमर ०.८०% वाढीसह १,०२३ स्तरावर बंद झाला. याशिवाय डॉ. रेड्डीस ०.७५% च्या उसळीसह १,२३७ स्तरांवर बंद झाला.

आजचे टॉप लॉसर्स स्टॉकटाटा ग्रुप कंपनी ट्रेंटचे शेअर्स सर्वाधिक ८.२३% घसरले आणि ५,२७७ रुपयांवर बंद झाले, तर बीईएलचे शेअर्स ३.१९% घसरून २७९.७५ वर बंद झाले. यानंतर भारती एअरटेलचे शेअर्स २.४६ टक्क्यांनी घसरून १,६२० रुपयांच्या पातळीवर बंद झाले. तर टायटन कंपनीचा समभाग २.३०% च्या घसरणीसह ३,४११ च्या पातळीवर बंद झाला. याशिवाय NTPC २.१३% ने घसरून ३१२.८० च्या पातळीवर बंद झाला आहे.

मेटल आणि FMCG वर दबावआजच्या व्यवसायात निफ्टी फार्मा निर्देशांक ०.६४% च्या वाढीसह २२,००९ च्या स्तरावर बंद झाला. निफ्टी आयटी देखील ०.३१% ने मजबूत झाला आणि ४३,०२१ च्या पातळीवर बंद झाला. बँक निफ्टी ०.०८% च्या किंचित वाढीसह ५०,३८२ च्या स्तरावर बंद झाला. तर, निफ्टी मेटल ०.९३% च्या घसरणीसह २३,२९९ च्या स्तरावर बंद झाला. निफ्टीचा एफएमसीजी निर्देशांक ०.९६% घसरला आणि ५५,८४२ च्या पातळीवर बंद झाला. 

टॅग्स :टाटाशेअर बाजारशेअर बाजारनिर्देशांक