Stock Market : शेअर मार्केट गुंतवणूकदारांना शांत झोपू देत नसल्याचे दिसत आहे. मंगळवारी बाजारात वाढ झाल्यानंतर आज पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज पुन्हा शेअर बाजार सपाट बंद झाला. सेन्सेक्स 28 अंकांनी घसरला आणि ७५,९३९ वर व्यवहार बंद झाला, तर निफ्टी ८ अंकांनी घसरला आणि बाजार २२,९३६ वर बंद झाला. निफ्टी स्मॉलकॅप १०० मध्ये ३५७ अंकांची वाढ दिसून आली आहे. यासह तो १५,५३५ वर व्यापार बंद झाला आहे. क्षेत्रीय निर्देशांकाबद्दल बोलायचे झाले तर, निफ्टी बँक, मेटल, रियल्टी आणि पीएसयू बँकेच्या समभागांमध्ये जोरदार वाढ दिसून आली आहे. आयटी क्षेत्रात मात्र जोरदार विक्री झाली. यासोबतच आज एफएमसीजी, ऑटो आणि फार्मा सेक्टरमध्येही किरकोळ विक्री दिसून आली.
कोणत्या शेअर्समध्ये घडामोड?निफ्टी पॅक समभागांमध्ये, सर्वात मोठी वाढ बीईएलमध्ये ३.५४ टक्क्यांनी, हिंदाल्कोमध्ये २.७० टक्क्यांनी, आयशर मोटर्समध्ये १.९२ टक्क्यांनी, ॲक्सिस बँकमध्ये १.५३ टक्क्यांनी आणि लार्सन अँड टुब्रोमध्ये १.५२ टक्क्यांनी वाढ झाली. याउलट सर्वात मोठी घसरण डॉ. रेड्डीजमध्ये २.४८ टक्क्यांनी, टीसीएसमध्ये २.२८ टक्क्यांनी, इन्फोसिसमध्ये २.२२ टक्क्यांनी, एचयूएलमध्ये २ टक्के आणि अदानी एंटरप्रायझेसमध्ये १.९५ टक्क्यांची नोंद झाली आहे.
कशी होती क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती? क्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोलायचे तर, निफ्टी मिडस्मॉल फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये २.१६ टक्के, निफ्टी मिडस्मॉल आयटी आणि टेलिकॉममध्ये १.१५ टक्के, निफ्टी ऑइल अँड गॅसमध्ये ०.७४ टक्के, निफ्टी कन्झ्युमर ड्युरेबल्समध्ये ०.४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. निफ्टी रिॲल्टी १.६७ टक्के, निफ्टी प्रायव्हेट बँक १.१३ टक्के, निफ्टी पीएसयू बँक १.३३ टक्के, निफ्टी मेटल १.२५ टक्के, निफ्टी मीडिया १.४३ टक्के, निफ्टी बँक ०.९८ टक्के आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस ०.७६ टक्के वाढले. याशिवाय निफ्टी ऑटोमध्ये ०.०४ टक्के, निफ्टी एफएमसीजीमध्ये ०.२३ टक्के, निफ्टी आयटीमध्ये १.३० टक्के, निफ्टी फार्मामध्ये ०.७१ टक्के, निफ्टी हेल्थकेअर निर्देशांकात ०.७८ टक्के आणि निफ्टी मिडस्मॉल हेल्थकेअरमध्ये ०.१५ टक्के घसरण झाली.
शेअर बाजाराला टेरिफची भितीअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांना रेसिप्रोकल टेरिफ लादण्याची धमकी दिली आहे. यामुळे अनेक शेअर्सला धक्का बसला आहे. गेल्या आठवड्यात मेटल शेअर्सला याचा फटका बसला आहे.