Join us

'ही' कंपनी देतेय 1000% चा डिव्हिडेन्ड, 1 लाख रुपयांचे बनवले तब्बल 2 कोटी, गुंतवणुकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 15:12 IST

व्हॅल्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र स्कूटर्सवर कसल्याही प्रकारचे कर्ज नाही.

ऑटो इंडस्ट्रीत कार्यरत असलेली एक मिड-कॅप कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना मोठे गिफ्ट देणार आहे. महाराष्ट्र स्कूटर्स (Maharashtra Scooters) लिमिटेड, असे या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 1000% चा लाभांश (डिव्हिडेन्ड) देणार आहे. व्हॅल्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र स्कूटर्सवर कसल्याही प्रकारचे कर्ज नाही.

आम्ही 31 मार्च 2023 ला संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी प्रत्येक शेअरवर 1000% एवढा अंतरिम डिव्हिडेंड देत आहोत, असे कंपनीने रेग्युलेटरी फायलिंगमध्ये म्हटले आहे. याचा अर्थ, प्रत्येक शेअरवर गुंतवणूकदाराला 100 रुपयांचा डिव्हिडेंड मिळेल. अंतरिम डिव्हिडेन्ड 10 ऑक्टोबर 2022 ला अथवा याच्या जवळपास क्रेडिट होईल.

कंपनीचा शेअर 25 रुपयांवरून 5000 च्याही पुढे -महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेडच्या शेअर्सनी गेल्या काही वर्षांत जबरदस्त परतावा दिला आहे. कंपनीचा शेअर 6 नोव्हेंबर 2001 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) 25 रुपयांवर होता. तो 16 सप्टेंबर 2022 रोजी BSE वर 5140 रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. जर एखाद्याने 6 नोव्हेंबर 2001 रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आता त्याचे 2.05 कोटी रुपये झाले असते.

महाराष्ट्र स्कूटर्सच्या शेअर्सची 52 आठवड्यांतील हाई लेव्हल 5309.05 रुपये एवढी आहे. तर, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांतील लो-लेव्ह 3319.15 रुपये एवढी आहे.

 

टॅग्स :व्यवसायगुंतवणूकशेअर बाजारशेअर बाजार