Join us

गुंतवणूकीची मोठी संधी; लवकरच येतोय LG चा १५००० कोटींचा IPO, जाणून घ्या तारीख...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 15:00 IST

LG Electronics IPO: शेअर बाजारातून कमाईची मोठी संधी.

LG Electronics IPO: तुम्ही शेअर बाजारातगुंतवणूक करुन कमाई करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्याकडे मोठी संधी आहे. दक्षिण कोरियाची दिग्गज कंपनी LG इलेक्ट्रॉनिक्स लवकरच आपला IPO लॉन्च करणार आहे. कंपनी आयपीओद्वारे १०.२ कोटी शेअर्स किंवा १५,००० कोटी रुपयांची १५ टक्के हिस्सेदारी विकण्याचा विचार करत आहे. म्हणजेच, कंपनी आयपीओद्वारे आपल्या भारतीय युनिटमधून १५ टक्के हिस्सा कमी करण्याचा विचार करत आहे. 

कधी लाँच होणार IPO ?एलजीने एप्रिल-मे महिन्यात आयपीओ लॉन्च करण्याची योजना आखली होती, परंतु टॅरिफ, बाजारातील चढउतार आणि कमी मूल्यांकनाबाबत वाढत्या तणावामुळे त्यांनी तो पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आता बाजारातील परिस्थिती चांगली मानून एलजी ऑक्टोबर २०२५ मध्ये आपला आयपीओ लाँच करणार आहे. कंपनीने डिसेंबर २०२४ मध्येच सेबीकडे या संदर्भातील कागदपत्रे सादर केली होती. मॉर्गन स्टॅनली इंडिया कंपनी, जेपी मॉर्गन इंडिया, अ‍ॅक्सिस कॅपिटल, बोफा सिक्युरिटीज इंडिया आणि सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया हे या इश्यूचे बुक-रनिंग लीड मॅनेजर आहेत. 

अनेक आयपीओ पाइपलाइनमध्येऑक्टोबरमध्ये आयपीओ लाँच करून कंपनी देशाच्या प्राथमिक बाजारपेठेतील जोरदार तेजीचा फायदा घेऊ इच्छिते. २०२५ मध्ये आतापर्यंत सुमारे ३० कंपन्यांनी आयपीओद्वारे ६०,००० कोटींहून अधिक रक्कम उभारली आहे, ज्यामध्ये एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस १२,५०० कोटी रुपयांच्या आयपीओसह अव्वल स्थानावर आहे. येत्या काळात, ७०,००० कोटी रुपयांचे आणखी अनेक आयपीओ पाइपलाइनमध्ये आहेत, ज्यामध्ये टाटा कॅपिटल (१७,२०० कोटी), ग्रोव, मीशो, फोनपे, बोट, वीवर्क इंडिया, लेन्सकार्ट, शॅडोफॅक्स आणि फिजिक्स वाला सारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.

(टीप-शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटइनिशिअल पब्लिक ऑफरिंगगुंतवणूक