Leela Hotels IPO: लक्झरी हॉटेल 'द लीला' चालवणाऱ्या Schloss Bangalore Limited ची शेअर बाजारात सुस्त सुरुवात झाली. कंपनीचे शेअर्स एनएसईवर ६.६७ टक्क्यांच्या डिस्काऊंटवर लिस्ट झाले. कंपनीचे शेअर्स ४०६ रुपये प्रति शेअरवर लिस्ट झाले. कंपनीचा इश्यू प्राइस ४३५ रुपये प्रति शेअर होता. मात्र, लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत तेजी दिसून आली.
कंपनीचा शेअर बीएसई वर ४०६.५० रुपयांवर उघडला. पण काही काळानंतर, कंपनीचा शेअर बीएसई वर ६ टक्क्यांहून अधिक वाढून ४३२.१५ रुपयांवर पोहोचला. ही किंमत देखील त्याच्या इश्यू प्राईजपेक्षा कमी आहे.
४ पटींपेक्षा अधिक सबस्क्रिप्शन
लीला हॉटेल्सचा आयपीओ ३ दिवसांत ४.७२ पट सबस्क्राइब झाला. किरकोळ श्रेणीमध्ये हा आयपीओ ८७ टक्के सबस्क्राइब झाला. तर क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्स श्रेणीमध्ये हा शेअर ७.८२ पट सबस्क्राइब झाला. त्याच वेळी, एनआयआय श्रेणीमध्ये १.०८ पट सबस्क्राइब झाला. हा आयपीओ २६ मे रोजी उघडला. गुंतवणूकदारांना २८ मे पर्यंत आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी होती.
कंपनीने ३४ शेअर्सचा एक लॉट तयार केला होता. ज्यामुळे गुंतवणूकदारांना किमान १४,७९० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार होत. हा आयपीओ २३ मे २०२५ रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होता. अँकर गुंतवणूकदारांकडून १५७५ कोटी रुपये उभारण्यात कंपनीला यश आलं.
हा एक मेनबोर्ड आयपीओ होता. कंपनीच्या आयपीओची साईज ३५०० कोटी रुपये होती. कंपनीनं ५.७५ कोटी शेअर्सचा नवीन इश्यू जारी केला. त्याच वेळी २.३० कोटी नवीन शेअर्स जारी केलेत. जेएम फायनान्शियल लिमिटेड, बोफा सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड, मॉर्गन स्टॅनली इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आणि इतरांना आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले होतं.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)