Join us

IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 14:14 IST

L.T.Elevator IPO: शेअर बाजारात आज एका कंपनीच्या शेअर्सची बंपर लिस्टिंग झाली. कंपनीच्या शेअर्सनी पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मालामाल केलंय.

L.T.Elevator IPO: शेअर बाजारात एलटी लिफ्टच्या शेअर्सची बंपर लिस्टिंग झाली. कंपनीच्या शेअर्सनी पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. एलटी लिफ्ट लिमिटेडचे ​​शेअर्स शुक्रवारी ७४.४९ टक्क्यांनी वाढून १३६.१० रुपयांवर लिस्ट झाले. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअर्सची किंमत ७८ रुपये होती. लिस्टिंगनंतर लगेचच एलटी लिफ्ट लिमिटेडच्या शेअर्समध्ये काही प्रमाणात प्रॉफिट बुकिंग दिसून आलं. कंपनीचे शेअर्स १ टक्क्यांहून अधिक घसरणीसह १३४ रुपयांवर व्यवहार करत होते. कंपनीच्या शेअर्सनं १४२.५० रुपयांच्या उच्चांकी पातळीलाही स्पर्श केलाय.

१८२ पटींपेक्षा अधिक सबस्क्राइब

एल.टी. एलिव्हेटर लिमिटेडचा आयपीओ १८२.९५ पट सबस्क्राइब झाला. सामान्य गुंतवणूकदारांचा कोटा १५८.९० पट सबस्क्राइब झाला. नॉन-इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (एनआयआय) कॅटेगरीला ३५६.१६ पट सबस्क्रिप्शन मिळालं. तर क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्स (क्यूआयबी) कॅटेगरीला ९५.१० पट सबस्क्रिप्शन मिळाला. एल.टी. एलिव्हेटर आयपीओमध्ये सामान्य गुंतवणूकदारांना फक्त दोन लॉटसाठी बोली लावण्याची परवानगी होती. प्रत्येक लॉटमध्ये ३,२०० शेअर्स आहेत. याचा अर्थ असा की सामान्य गुंतवणूकदारांना कंपनीच्या आयपीओमध्ये ₹२,४९,६०० गुंतवणूक करावी लागली होती.

एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा

कंपनी काय करते?

एलटी लिफ्ट लिमिटेडची स्थापना ऑगस्ट २००८ मध्ये झाली. कंपनी दर्जेदार लिफ्ट सिस्टम सोल्यूशन्स प्रदान करते. एलटी लिफ्टचा फोकस उत्कृष्ट सेवा, इंजिनीअरिंग आणि टेक्निकल सोल्यूशन्सवर आहे. कंपनी एलिव्हेटर मॅन्युफॅक्चरिंग, इन्स्टॉलेशन, कमिशनिंग आणि अॅन्युअल मेंटेनन्सयासारख्या व्यापक सुविधा पुरवते. गुणवत्ता हमीसाठी कंपनीकडे इन-हाऊस टेस्टिंग लॅब आहे. आयपीओपूर्वी, प्रवर्तकांकडे कंपनीच्या ८५.१४% हिस्सा होता. अरविंद गुप्ता, उषा गुप्ता आणि यश गुप्ता हे कंपनीचे प्रवर्तक आहेत. कंपनीच्या आयपीओची एकूण साईज ₹३९.३७ कोटी होती.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंगगुंतवणूक