KEI Industries share price: शुक्रवारी शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. या सकारात्मक वातावरणाचा फायदा KEI Industries च्या शेअर्सना झाला असून, कंपनीचा शेअर सुमारे ५ टक्क्यांनी वाढून ₹४,७८५ या पातळीवर पोहोचला. हा दर शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ठरला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
केबल आणि वायर व्यवसायात सक्रिय असलेल्या या कंपनीचा शेअर ऑगस्ट २०२४ नंतरच्या सर्वोच्च स्तरावर व्यवहार करत आहे. याआधी १४ जून २०२४ रोजी शेअरने ₹५,०४० चा सर्वकालीन उच्चांक गाठला होता.
शेअरचा दमदार परफॉर्मन्स
KEI Industries च्या शेअरने अलीकडील काळात गुंतवणूकदारांना भक्कम परतावा दिला आहे. ७ एप्रिल २०२५ रोजी ₹२,४४३.70 च्या ५२ आठवड्यांच्या नीचांकापासून सुमारे १००% वाढ झाली. तर, मागील एका महिन्यात १६%, तीन महिन्यांत १३%, सहा महिन्यांत १९% वाढ, तर मागील एका वर्षात २७% वाढ झाली.
कंपनी नेमकं काय करते?
KEI Industries ही ऑस्ट्रेलियाला Extra High Voltage (EHV) आणि ३३० kV केबल्स पुरवणारी पहिली भारतीय कंपनी आहे. तर , संयुक्त अरब अमिरात आणि स्पेनला २२० kV केबल्सचा पुरवठा करते. याशिवाय, UK National Grid Framework Agreement अंतर्गत ४०० kV पर्यंतच्या व्होल्टेजसाठी पात्र ठरणारी एकमेव भारतीय कंपनी आहे.
ऑर्डर बुक मजबूत
३१ डिसेंबर २०२५ पर्यंत कंपनीकडे एकूण ₹३,९२८ कोटींची ऑर्डर बुक होती. त्यामध्ये EPC: ₹३६१ कोटी, Extra High Voltage केबल्स: ₹७१७ कोटी, देशांतर्गत केबल्स: ₹२,३२६ कोटी आणि निर्यात ऑर्डर्स: ₹४२४ कोटी आहे.
ब्रोकरेज फर्म्सचे मत
Elara Capital चे विश्लेषक KEI Industries कडे लाँग टर्म गुंतवणुकीसाठी सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत आहेत. त्यामागील प्रमुख कारणे मजबूत विक्री वाढ, सातत्याने सुधारत असलेले मार्जिन आणि निर्यातीवर केंद्रित धोरण आहे. ब्रोकरेज फर्मने शेअरवर ‘Accumulate’ रेटिंग कायम ठेवली आहे. पुढील चार वर्षांत २०% वाढीचे लक्ष्य कंपनीने कायम राखले असून, निर्यात वाढवणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.
(टीप-शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)
Web Summary : KEI Industries shares hit a 52-week high, boosted by ₹3928 crore in orders. The company exports high voltage cables and aims for 20% growth, with brokerages maintaining a positive outlook due to strong sales and improving margins.
Web Summary : KEI इंडस्ट्रीज के शेयरों में ₹3928 करोड़ के ऑर्डर मिलने से 52 सप्ताह का उच्च स्तर देखा गया। कंपनी उच्च वोल्टेज केबल निर्यात करती है और उसका लक्ष्य 20% विकास करना है। ब्रोकरेज मजबूत बिक्री और बेहतर मार्जिन के कारण सकारात्मक दृष्टिकोण बनाए हुए हैं।