Kalyan Jewellers India Ltd: कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेडच्या शेअरमध्ये आज पुन्हा पाच टक्क्यांहून अधिक घसरण पाहायला मिळाली. सलग तिसऱ्या दिवशी कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. कल्याण ज्वेलर्सच्या शेअरमध्ये गेल्या ५ पैकी ४ दिवसांत घसरण झाली आहे. तर मागील ५ ट्रेडिंग दिवसांमध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्यानं घसरण पाहायला मिळाली होती.
आज बीएसईवर हा शेअर ५३८.७० रुपयांच्या पातळीवर उघडला. तर दिवसभरात कंपनीच्या शेअरची किंमत ६ टक्क्यांहून अधिक घसरून ५०३.२५ रुपयांवर आली. २ जानेवारी रोजी कंपनीचं मार्केट कॅप ८२,००० कोटी रुपये होतं. ते आज ५०,००० कोटी रुपयांवर आलंय.
१० पैकी ९ वेळा घसरण
शुक्रवारच्या घसरणीत भर घालत आठवडाभरात या शेअरमध्ये १८ टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात कल्याण ज्वेलर्सचा शेअर १९ टक्क्यांनी घसरला होता. १० पैकी ९ ट्रेडिंग दिवसांमध्ये कंपनीच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे.
टार्गेट प्राइस काय?
या घसरणीनंतरही ब्रोकरेज हाऊसेस एचएसबीसी आणि सिटी कंपनीच्या शेअर्सवर बुलिश आहेत. सीएनबीसी टीव्ही १८ च्या रिपोर्टनुसार, ब्रोकरेज हाऊसनं ८१० रुपयांचे टार्गेट प्राइस निश्चित केलय. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ७९४.६० रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ३२२.०५ रुपये आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)