Join us

मोजतानाही लागेल धाप! IPO येण्याआधीचं Jio कंपनीचं मूल्यांकन बाप रे बाप...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 15:47 IST

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या आणखी एका कंपनीची बंपर लिस्टिंगची तयारी सुरू आहे. परंतु जिओसाठी सध्या चांगली बातमी समोर आली आहे.

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या आणखी एका कंपनीची बंपर लिस्टिंगची तयारी सुरू आहे. ही कंपनी आहे जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड (Jio Platforms Ltd.). याबद्दल देशातील प्रसिद्ध ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय सिक्युरिटीजनं (ICICI Securities) मोठं मूल्यांकन दिलं आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजनं जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडचं इक्विटी मूल्य १४८ अब्ज अमेरिकन डॉलर्स (सुमारे १३,००० अब्ज रुपये) पर्यंत वाढवलं ​​आहे. नुकत्याच जारी केलेल्या एका अहवालात, ब्रोकिंग कंपनीने असा अंदाज व्यक्त केला आहे की, आर्थिक वर्ष २०२५ ते २०२८ दरम्यान जिओ प्लॅटफॉर्मचे EBITDA/PAT CAGR मध्ये आर्थिक प्रदर्शन १८ ते २१ टक्क्यांच्या दरानं वाढेल. आर्थिक वर्ष २०२८ पर्यंत कंपनीचा ‘फ्री कॅश फ्लो’ देखील वाढून ५५८ अब्ज रुपये होण्याची अपेक्षा आहे.

जे पी मॉर्गनचा काय आहे अंदाज?

मागील महिन्यात, दुसरी ब्रोकिंग फर्म जे पी मॉर्गनने जिओ प्लॅटफॉर्मचे इक्विटी मूल्यांकन १३६ अब्ज डॉलर (सुमारे ११,९३६ अब्ज रुपये) लावलं होतं. आयसीआयसीआय सिक्युरिटीजनं मागील अंदाजापेक्षा १२ अब्ज डॉलर (सुमारे १,०५० अब्ज रुपये) अधिकचा अंदाज सादर केला आहे. नुकत्याच झालेल्या रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत, मुकेश अंबानी यांनी वर्ष २०२६ च्या पहिल्या सहामाहीत जिओचा आयपीओ आणण्याची घोषणा केली होती.

१०१ वर्ष जुनी कंपनी आयपीओ आणणार, १६६७ कोटी रुपये उभारणार; 'या' दिवसापासून करता येणार गुंतवणूक

एअरटेलची रेटिंगही वाढली

ब्रोकरिंग फर्मनं भारती एअरटेलला (Bharti Airtel) देखील बाय म्हणजे खरेदीच्या रेटिंगमध्ये अपग्रेड केलं आहे. आपल्या सुधारित मूल्यानुसार भारतीसाठी टार्गेट प्राईज १९६० रुपयांवरून २४०० रुपये केली आहे. वाढती विजिबलिटी आणि उत्तम फायनान्शिअल स्ट्रक्चर हे यामागील कारण असल्याचं सांगितलं आहे.

नवीन व्यवसायांवर लक्ष

आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे मत आहे की, जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड कंटेंट, स्टोरेज, डिजिटल एंटरप्राइज सोल्युशन, एमएसएमईसाठी मॅनेज्ड सर्व्हिस आणि रिलायन्स इंटेलिजन्सद्वारे संचालित एआय (AI) डिप्लॉयमेंट सारख्या नवीन व्यवसायांनाही पुढे नेत आहे. हे नवीन क्षेत्र, मध्यम कालावधीत अधिक मूल्य निर्माण करू शकतात. कंपनीनं अंदाज लावला आहे की, आर्थिक वर्ष २०२५ ते २०२८ दरम्यान, जिओ प्लॅटफॉर्मच्या नॉन-कनेक्टिव्हिटी व्यवसायाचा वाढीचा दर ४६.७% राहील. ब्रोकरिंग फर्मनं हे मान्य केलंय की जिओ प्लॅटफॉर्मनं ज्या प्रकारे ५जी रोलआउट केले आहे आणि ६जी चं पेटंट मिळवले आहेत, त्याचा फायदाही कंपनीला मिळेल. ५जी बाजारात जिओचा हिस्सा ६६ टक्क्यांहून अधिक आहे.

मूल्यांकन वाढवण्याची कारणं

अहवालात आयसीआयसीआय सिक्युरिटीजनं भारतीय दूरसंचार कंपन्यांचं मूल्यांकन वाढवण्याची अनेक कारणे दिली आहेत. यामध्ये क्षेत्रातील उत्तम व्यवसाय, शानदार वित्तीय रचना, व्यवसायाच्या आघाडीवर ५जी चा जोर आणि मूल्यांकन घसरण्याची कमी शक्यता यांचा समावेश आहे. दूरसंचार कंपन्या फिक्स्ड ब्रॉडबँड, व्हॅल्यू-एडेड सर्व्हिसेस सोबतच एंटरप्राइज ऑफरिंग, ज्यात डेटा सेंटर, SaaS आणि मॅनेज्ड सर्व्हिसेस सारख्या उत्पादनांचाही विस्तार करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Jio IPO Valuation Soars Before Launch: A Staggering Figure!

Web Summary : Jio Platforms' IPO is anticipated in 2026. ICICI Securities values it at $148 billion, exceeding JP Morgan's $136 billion estimate. Jio's 5G rollout and new ventures like AI deployment contribute to this valuation. Bharti Airtel's rating also improved due to financial visibility and structure.
टॅग्स :जिओशेअर बाजारगुंतवणूकइनिशिअल पब्लिक ऑफरिंग