Join us

झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 15:20 IST

Rekha Jhunjhunwala Shares: प्रसिद्ध गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांनी एका कंपनीतील आपला संपूर्ण हिस्सा विकला आहे. त्यांचे पती आणि ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्याकडून त्यांना कंपनीतील हिस्सा मिळाला होता.

Rekha Jhunjhunwala Shares: भारतीय शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदाररेखा झुनझुनवाला यांनी आता नझारा टेक्नॉलॉजीजमधील (Nazara Technologies) आपला संपूर्ण हिस्सा विकला आहे. त्यांचे पती आणि ज्येष्ठ गुंतवणूकदारराकेश झुनझुनवाला यांच्याकडून त्यांना कंपनीतील हिस्सा मिळाला होता.

नझारा टेक्नॉलॉजीजच्या शेअरनं गेल्या तीन वर्षांत गुंतवणूकदारांना १११ टक्के प्रभावी परतावा दिला आहे. ही कंपनी भारताच्या गेमिंग क्षेत्रातील एक प्रमुख नाव आहे. मधुसूदन केला आणि झिरोधाचे संस्थापक नितीन कामथ यांच्यासारख्या मोठ्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक देखील आहे. रेखा झुनझुनवाला यांचं बाहेर पडणं हे बाजारातील महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.

'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

एकूण २५ कंपन्यांमध्ये हिस्सा

मार्च २०२५ पर्यंत रेखा झुनझुनवाला यांच्याकडे नझारा टेक्नॉलॉजीजमध्ये ७.०६% हिस्सा होती आणि त्यांच्याकडे सुमारे ६१ लाख शेअर्स होते. पण जून २०२५ मध्ये त्या संपूर्ण हिस्सा विकून कंपनीतून बाहेर पडल्या. १३ जून रोजी त्यांनी बीएसईवर १३ लाख आणि एनएसईवर १४ लाख शेअर्सची विक्री केली. प्रत्येक शेअरची किंमत सुमारे १,२२५ रुपये होती. या विक्रीतून त्यांना सुमारे ३३४ कोटी रुपये मिळाले.

तरीही कंपनीत आणखी काही मोठे गुंतवणूकदार आहेत. कंपनीत मधुसूदन केला यांचा १.१८ टक्के आणि निखिल कामत यांचा १.६२ टक्के हिस्सा आहे. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे एकूण २५ कंपन्यांचे शेअर्स आहेत, ज्यांची किंमत ३९ हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. जून २०२५ पर्यंत त्यांची संपत्ती ४२,२५२ कोटी रुपयांवर पोहोचली, जी मार्च २०२५ च्या तुलनेत १४९% जास्त आहे. म्हणजे त्यांनी चांगली कमाई केली आहे.

सहा महिन्यांत मोठी तेजी

नझारा टेक्नॉलॉजीजचा शेअर १.२९ टक्क्यांनी घसरून १,३३४ रुपयांवर बंद झाला. गेल्या ५ दिवसांत या शेअरमध्ये ३.८८ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. मात्र, गेल्या ६ महिन्यांत नझारा टेक्नॉलॉजीजच्या शेअरनं ४२.७१ टक्के परतावा दिला आहे. या वर्षी आतापर्यंत या शेअरने ३२.०५ टक्के सकारात्मक परतावा दिलाय.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :रेखा झुनझुनवालाराकेश झुनझुनवालाशेअर बाजारगुंतवणूक