Join us

टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 16:55 IST

IT Stocks Lead the Fall : जीएसटी कपातीनंतर ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी गुंतवणूकदार मात्र निराश झाले.

IT Stocks Lead the Fall : एकीकडे आजपासून जीएसटी कपातीचे दर लागू झाल्यानंतर बाजारपेठांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे शेअर बाजारात मात्र निराशा पसरली. सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण दिसून आली. दोन्ही प्रमुख बेंचमार्क इंडेक्स लाल निशाणीवर बंद झाले. सेन्सेक्स ४६६ अंकांच्या घसरणीसह बंद झाला, तर निफ्टी ५० मध्ये १२५ अंकांची मोठी घसरण पाहायला मिळाली.

सेन्सेक्सने ८२,१५१ च्या पातळीवर व्यवहार सुरू केला आणि दिवसाच्या अखेरीस ०.५६ टक्क्यांच्या घसरणीसह तो ८२,१५९ च्या पातळीवर बंद झाला. तर, निफ्टी ५० ने २५,२३८ च्या पातळीवर ओपनिंग दिली आणि ०.४९ टक्क्यांच्या घसरणीसह तो २५,२०२ च्या पातळीवर बंद झाला. प्रमुख निर्देशांकांच्या तुलनेत मिडकॅप आणि स्मॉलकॅप सेगमेंटची कामगिरी अधिक कमजोर राहिली. बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये ०.७८ टक्क्यांची, तर बीएसई स्मॉलकॅप इंडेक्समध्ये ०.७१ टक्क्यांची घसरण दिसून आली.

टॉप गेनर्स आणि लूजर्ससर्वाधिक वाढलेले शेअर्ससोमवारी निफ्टी ५० मधील कंपन्यांमध्ये सर्वाधिक वाढ अदानी एंटरप्रायझेसमध्ये झाली, ज्यात ४.१८ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. यानंतर, इटरनलमध्ये १.५८ टक्के, बजाज फायनान्समध्ये १.४२ टक्के, अदानी पोर्ट्समध्ये १.१५ टक्के आणि अल्ट्राटेक सिमेंट्समध्ये १.१४ टक्क्यांची वाढ दिसून आली.

सर्वाधिक घसरलेले शेअर्सनिफ्टी ५० मधील कंपन्यांमध्ये सर्वाधिक नुकसान टेक महिंद्राला झाले, ज्यात ३.१२ टक्क्यांची घसरण झाली. त्यानंतर, टीसीएसमध्ये ३.०२ टक्के, इन्फोसिसमध्ये २.६५ टक्के, विप्रोमध्ये २.१७ टक्के आणि सिप्लामध्ये २.१४ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली.

क्षेत्रीय निर्देशांकांची स्थितीसोमवारच्या घसरणीमध्ये सर्वाधिक फटका आयटी क्षेत्राला बसला. निफ्टी आयटी २.९५ टक्क्यांच्या मोठ्या घसरणीसह बंद झाला. यानंतर, निफ्टी फार्मामध्ये १.४१ टक्के, निफ्टी इंडिया डिफेन्समध्ये ०.९ टक्के, निफ्टी एफएमसीजीमध्ये ०.४७ टक्के, आणि निफ्टी पीएसयू बँक मध्ये ०.३६ टक्क्यांची घट दिसून आली.

वाचा - iPhone 17 खरेदीवर करा १०,००० रुपयांपेक्षा जास्त बचत! जाणून घ्या सर्व बँक आणि एक्सचेंज ऑफर्स

दुसरीकडे, निफ्टी एनर्जीमध्ये ०.६९ टक्के, निफ्टी मीडियामध्ये ०.४८ टक्के आणि निफ्टी मेटलमध्ये ०.३९ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. 

टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटटाटामहिंद्रागुंतवणूक