IPO News : आयपीओमध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. चालू आठवड्यात शेअर बाजारात एक नव्हे तर तब्बल पाच मोठे आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुले होणार आहेत. यामध्ये तीन 'मेनबोर्ड' आणि दोन 'एसएमई' आयपीओचा समावेश आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा पैसे लावण्याची चांगली संधी मिळणार आहे.
या आठवड्यात बाजारात दाखल होणाऱ्या कंपन्या आणि त्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत.लेन्सकार्ट सोल्युशन आयपीओ (मेनबोर्ड)कंपनीचे स्वरूप: आयवेअर क्षेत्रातील मोठी कंपनी.सबस्क्रिप्शनची तारीख: ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूक करता येईल.उद्दिष्ट: आयपीओद्वारे कंपनीने ७,२७८ कोटी रुपये जमा करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.प्राइस बँड: अद्याप निश्चित झालेला नाही.लिस्टिंग : संभाव्य लिस्टिंगची तारीख १० नोव्हेंबरला आहे.
स्टड्स एक्सेसरीज आयपीओ (मेनबोर्ड)कंपनीचे स्वरूप: मोटारसायकल हेलमेट आणि ॲक्सेसरीज बनवणारी अग्रगण्य कंपनी.सबस्क्रिप्शनची तारीख: ३० ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर.स्वरूप:*हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल आहे, म्हणजे जुने गुंतवणूकदार त्यांची हिस्सेदारी विकणार आहेत.
ओर्कला इंडिया आपीओ (मेनबोर्ड)स्वरूप: हा आयपीओ देखील पूर्णपणे ऑफर फॉर सेल आहे, यात कोणतेही नवीन शेअर्स जारी केले जाणार नाहीत.विक्रेते: प्रमोटर्सपैकी ओर्कला एशिया पॅसिफिक लिमिटेड, नवाझ मीरन आणि फिरोज मीरन हे त्यांची हिस्सेदारी विकणार आहेत.
जयेश लॉजिस्टीक्स आयपीओ (SME)कंपनीचे स्वरूप: कोलकातास्थित लॉजिस्टिक्स कंपनी.सबस्क्रिप्शनची तारीख: २७ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर.प्राइस बँड: ११६ ते १२२ रुपये प्रति शेअर.निधी उभारणी: कंपनी २३.४७ लाख शेअर्स विकून एकूण २८.६३ कोटी रुपये जमा करेल.
गेम चेंजर टॅक्सफॅब आयपीओ IPO (SME)कंपनीचे स्वरूप : वस्त्रोद्योग क्षेत्रातील कंपनी.सबस्क्रिप्शनची तारीख : २८ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर.प्राइस बँड : ९६ ते १०२ रुपये प्रति शेअर.निधी उभारणी : कंपनी ५४ लाख नवीन शेअर्स जारी करून ५४.८४ कोटी रुपये जमा करण्याचा प्रयत्न करेल.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Good news for IPO investors! Five major IPOs, including Lenskart, Studs Accessories, and Orkila India, are opening for subscription this week. These include both mainboard and SME IPOs, offering diverse investment opportunities. Investors should consult experts before investing, as market investments carry risk.
Web Summary : आईपीओ निवेशकों के लिए अच्छी खबर! लेंसकार्ट, स्टड्स एक्सेसरीज और ओर्कला इंडिया सहित पांच बड़े आईपीओ इस सप्ताह सदस्यता के लिए खुल रहे हैं। इनमें मेनबोर्ड और एसएमई आईपीओ दोनों शामिल हैं, जो विविध निवेश अवसर प्रदान करते हैं। निवेशकों को निवेश से पहले विशेषज्ञों से सलाह लेनी चाहिए, क्योंकि बाजार निवेश जोखिम भरा होता है।