Share Market : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. २ दिवसीय दौऱ्यामध्ये अनेक गोष्टींसाठी करार करण्यात आले. या दौऱ्याचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम होईल, अशी आशा गुंतवणूकदारांना होती. मात्र, संपूर्ण आठडाभर घसरणाऱ्या बाजाराने शेवटच्या दिवशीही आपला कल कायम ठेवला. अपवाद सोडला तर बहुतेक सेक्टरमध्ये आज घसरण पाहायला मिळाली. आजच्या व्यवहारात उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा धक्का बसला.
मुंबई शेअर बाजाराचानिर्देशांक सेन्सेक्स आज ०.२६ टक्क्यांच्या घसरणीसह ७५,९३९ अंकांवर बंद झाला. बाजार बंद होताना सेन्सेक्सच्या ३० समभागांपैकी ५ समभाग हिरव्या चिन्हावर आणि २५ समभाग रेड झोनमध्ये होते. त्याच वेळी, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आज ०.४४ टक्क्यांच्या घसरणीसह २२,९२९ वर बंद झाला. बाजार बंद होताना निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी ९ शेअर्स हिरव्या चिन्हावर आणि ४१ शेअर्स लाल चिन्हावर होते.
या शेअर्समध्ये मोठी घसरणशुक्रवारी निफ्टी पॅक शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण अदानी पोर्ट्समध्ये ४.६३ टक्के, बीईएलमध्ये ४.४२ टक्के, अदानी एंटरप्रायझेसमध्ये ४.२६ टक्के, ट्रेंटमध्ये २.८९ टक्के आणि ग्रासिममध्ये २.६९ टक्के होती. याशिवाय ब्रिटानियामध्ये ०.९५ टक्के, आयसीआयसीआय बँकेत ०.८१ टक्के, नेस्ले इंडियामध्ये ०.७६ टक्के, इन्फोसिसमध्ये ०.५३ टक्के आणि एचसीएल टेकमध्ये ०.५० टक्के वाढ नोंदवण्यात आली.
सर्व निर्देशांक रेड झोनमध्येआज शुक्रवारी सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल चिन्हावर बंद झाले. सर्वात मोठी घसरण निफ्टी मीडियामध्ये ३.५४ टक्क्यांनी नोंदवली गेली. याशिवाय निफ्टी मेटलमध्ये २.०६ टक्के, निफ्टी फार्मामध्ये २.९५ टक्के, निफ्टी पीएसयू बँकेत २.२४ टक्के, निफ्टी प्रायव्हेट बँकेत ०.७० टक्के, निफ्टी रियल्टीमध्ये २.१७ टक्के, निफ्टी हेल्थकेअर इंडेक्समध्ये २.४९ टक्के, निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल्समध्ये २.५१ टक्के, निफ्टी ऑइल अँड गॅसमध्ये १.६१ टक्के, निफ्टी मिडस्मॉल हेल्थकेअरमध्ये २.७० टक्के, निफ्टी मिडस्मॉल आयटी आणि टेलिकॉममध्ये २.३२ टक्के, निफ्टी बँक ०.५७ टक्के, निफ्टी ऑटो १.४६ टक्के, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस ०.४५ टक्के, निफ्टी एफएमसीजी ०.४४ टक्के, निफ्टी आयटी ०.१० टक्क्यांनी घसरण झाली.