Join us

Investment Share Market : बाजारात कमाईची मोठी संधी, दोन डझन कंपन्या आणणार ३० हजार कोटींचे आयपीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 08:57 IST

Investment Share Market :निवडणुका संपताच बाजारात आगामी दोन महिन्यांत दोन डझन कंपन्यांचे आयपीओ येऊ घातले आहेत. बाजारातून ३० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम उचलण्याची योजना आहे.

Investment Share Market : निवडणुका संपताच बाजारात आगामी दोन महिन्यांत दोन डझन कंपन्यांचे आयपीओ येऊ घातले आहेत. बाजारातून ३० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम उचलण्याची योजना आहे. या कंपन्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला पुन्हा तिसरा कार्यकाळ मिळाल्यामुळे निर्माण झालेल्या उत्साहवर्धक वातावरणाचा अधिकाधिक कंपन्या लाभ उठविण्यास उत्सुक आहेत. वास्तविक, इक्विटी निर्देशांक नवीन उच्चांकावर असताना तसेच अनेक समभागांचे मूल्य खूपच वाढलेले असताना गुंतवणूकदार नवीन शेअर्स खरेदी करण्यास उत्सुक असल्याचे बँकर्सचे म्हणणे आहे. 

यामुळे उत्साह 

'कोटक इन्व्हेस्टमेंट बँकिंग'चे एमडी व्ही. जयशंकर यांनी सांगितले की, मोदी सरकारच्या पुनरागमनामुळे बाजार उत्साहित आहे. पायाभूत सुविधा व देशांतर्गत वस्तू उत्पादन वाढीस सरकारकडून समर्थन दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदार उत्साहात आहेत. 

आयपीओ कुणाचे? 

अनेक कंपन्यांचे आयपीओ प्रतीक्षेत आहेत. एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर, एमक्योर फार्मास्युटिकल्स, अलाइड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स, आशीर्वाद मायक्रोफायनान्स, स्टेनली लाइफस्टाइल, वारी एनर्जीज, प्रीमियर एनर्जीज, शिवा फामकिम, बन्सल वायर इंडस्ट्रीज, वन मोबिक्विक सिस्टम्स आणि सीजे डार्कल लॉजिस्टिक्स यांचा त्यात समावेश आहे. या कंपन्या पुढील दोन महिन्यांत आयपीओ बाजारात उतरविणार आहेत.

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार